- सुनील चरपेनागपूर : इराण-इस्रायल, अमेरिका युद्धामुळे रासायनिक खते तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांचे दर जागतिक पातळीवर १७ ते ६०० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत खत उत्पादन व त्यांच्या दरावर झाले आहेत. विविध खतांच्या दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांनी वाढ झाल्याने आगामी खरीप हंगामात पिकांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.
रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी नायट्राेजन, अमाेनिया, पाेटॅश, सल्फर, फाॅस्फाेरिक ॲसिड या मूलभूत घटकांची आवश्यकता असून, भारताला सर्व घटक माेठ्या प्रमाणात आयात करावे लागतात. युद्धामुळे हाेर्मुझ समुद्रधुनी बंद असल्याने मध्य पूर्वेकडील देशांमधून भारतात हाेणारा युरियाचा ४० टक्के, अमाेनिया ३० टक्के, पाेटॅश ९० टक्के, सल्फर ७६ टक्के तर फाॅस्फाेरिक ॲसिडचा पुरवठा ५० टक्क्यांनी घटला आहे. चीनने सल्फर व फाॅस्फाेरिक ॲसिडच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परिणामी, जागतिक पातळीवर या घटकांच्या दरांमध्ये १७ ते ६०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
खतांचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी न्युट्रिएन्ट बेस सबसिडी (एनबीएस) देते. युद्धामुळे सरकारला नायट्राेजन (युरिया) वगळता फाॅस्फरस व पाेटॅशियमच्या सबसिडीत १२ टक्क्यांची म्हणजेच ४१,५३४ काेटी रुपयांची वाढ करावी लागली आहे. केंद्र सरकारने खतांच्या सबसिडीसाठी सन २०२५-२६ च्या बजेटमध्ये १,८६,४६० काेटी तर २०२६-२७ च्या बजेटमध्ये १,७०,८०५ काेटी रुपयांची तरतूद केली आहे. यात नायट्राेजनच्या १,१६,८०५ तर फाॅस्फरस व पाेटॅशियमच्या ५४ हजार काेटी रुपयांच्या सबसिडीचा समावेश आहे. सरकारला फाॅस्फरस व पाेटॅशियमची सबसिडी किमान २० हजार काेटी रुपयांनी वाढवावी लागणार आहे.
खतांच्या दरातील वाढखते - जुने दर - नवीन दर - वाढ (रुपये/प्रति बॅग)
- १०:२६:२६ - १,८०० - २,२५० - २५.०० टक्के
- १९:१९:१९ - २,०७५ - २,३०० - १०.८४ टक्के
- २०:२०:००:१३ - १,४५० - १,८०० - २४.१४ टक्के
- २४:२४:०० - १,८०० - २,२०० - २२.२२ टक्के
- डीएपी - १,४०० - १,७५० - २५ टक्के
- एमओपी - ३५० - ६५० - ८५.७१ टक्के
जागतिक पातळीवरील दरघटक - जुने दर - नवीन दर - वाढ (डाॅलर/प्रति टन)
- युरिया - ४७२ - ७२६ ते ८५० - ८० टक्के
- अमाेनिया - ४९५ - ६५० - ३१ टक्के
- डीएपी - ५३० - ६७५ ते १,००० - २७ ते ८९ टक्के
- पाेटॅश - ३४८ - ३७२.५० - १७ टक्के
- सल्फर - १२५ - ८०० - ६०० टक्के
- फाॅस्फाेरिक ॲसिड - ९०० - १,०५० - १७ ते २० टक्के
खतांचे उत्पादन व मागणीघटक - आयात - उत्पादन - मागणी (लाख टन)
- युरिया - ७० ते १०० - ३०७.६७ - ३५०
- अमाेनिया -१४५ ते १६० - १५ ते २० - १७० ते १९०
- डीएपी - ४५ ते ५५ - ३३.७१ - १२० -
- एनपीके - ३० ते ४० - १२० - १००
- पाेटॅश - ४० ते ४५ - नगण्य - ४० ते ५०
- सल्फर - ५० ते ६० - १० ते १५ - ६० ते ७०
- फाॅस्फाेरिक ॲसिड - ३० ते ४० - २० ते ३० - ४५ ते ५०
Web Summary : War-induced global fertilizer component price hikes (17-600%) are burdening Indian farmers. Fertilizer prices have increased by 10.84-85.71%, raising kharif crop production costs despite government subsidies. Import disruptions of essential components contribute to the surge.
Web Summary : युद्ध के कारण वैश्विक उर्वरक घटक मूल्य वृद्धि (17-600%) से भारतीय किसान परेशान हैं। उर्वरक की कीमतें 10.84-85.71% तक बढ़ गई हैं, जिससे सरकारी सब्सिडी के बावजूद खरीफ फसल उत्पादन लागत बढ़ गई है। आवश्यक घटकों के आयात में व्यवधान वृद्धि का कारण है।