Join us

Lakhpati Didi Yojana: लखपती दीदींनी शोधल्या नव्या वाटा; उमेद अभियानातून मिळते नवी उमेद वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:19 IST

Lakhpati Didi Yojana: उमेद अभियानांतर्गत (Umed Abhiyaan) राज्य स्तरावरून लखपती दीदीच्या (Lakhpati Didi) कामाची रँकिंग जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार राज्यात बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर, तर विभागात नंबर वन ठरला आहे.

अनिल भंडारी

उमेद अभियानांतर्गत (Umed Abhiyaan) राज्य स्तरावरून लखपती दीदीच्या (Lakhpati Didi) कामाची रँकिंग जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार राज्यात बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर, तर विभागात नंबर वन ठरला आहे.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत आतापर्यंत ८१ हजार ४३१ महिला लखपती दीदी (Lakhpati Didi) झाल्या आहेत. ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिला तिच्या उपजीविकेमध्ये कोणत्याही दोन किंवा तीन स्रोतांचा वापर करून तिने तिच्या उत्पन्नामध्ये केलेली वाढ ही जर एक लाखापेक्षा जास्त असेल, तर अशा महिलांना लखपती दीदी (Lakhpati Didi) संबोधले जाते.

त्यानुसार बीड जिल्ह्याने लखपती दीदींची (Lakhpati Didi) माहिती मोबाइल ॲपमध्ये सीआरपीच्या (CRP) माध्यमातून नोंदी करून घेण्यात राज्यात चौथा तर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील आणि त्यांचे सहकारी उद्दिष्ट पूर्ण करीत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

प्रभाग संघ, ग्रामसंघ स्वयंसहायता समूह, गावातील समुदाय संसाधन व्यक्ती, तसेच तालुकास्तरीय सर्व कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण नियोजन करून हे काम यशस्वी केले.

शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील उमेद स्वयंसाहाय्यता गटाने(Umed Abhiyaan) शासन निधी, बँक साहाय्य आणि स्वतः च्या गुंतवणुकीतून कागदी ग्लासचा कारखाना उभारला आहे.

९०,००० दीदींची ओळख पटली

* बीड जिल्ह्याला ८८ हजार १५५ लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते; परंतु दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त ९० हजार ९०४ लखपती दीदींची ओळख पटविण्यात आली.

* आजघडीला २१ हजार ५३० महिलांची माहिती डिजिटल अजीविका रजिस्टरमध्ये नोंद झालेली आहे, तर ८६ हजार ३०७ महिलांची नोंद मोबाइल ॲपमध्ये केलेली आहे. या ॲपनुसार आतापर्यंत ८१ हजार ४३१ महिला लखपती झाल्या आहेत.

१७,८२९ गटांची चळवळ

* बीड जिल्ह्यात १७,८२९ बचत गटातील १ लाख ८३ हजार २२८ कुटुंब उमेद अभियानाशी जोडले गेलेले आहेत.

* मागीलवर्षी ४,१४१ गटांना १०७०२.९३ लाख रुपये बँक कर्ज वितरीत केले आहे. गाव पातळीवर समुदाय संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून संभाव्य लखपती दीदींची डिजिटल आजीविका रजिस्टर मध्ये नोंद करण्याचे काम सुरु आहे.

तालुकानिहाय लखपती दीदींची संख्या अशी...

अंबाजोगाई१०,०८२
आष्टी९,४११
बीड११,३०७
धारूर३,९८७
गेवराई१२,००४
केज९,५९०
माजलगाव८,८१९
परळी६,९३४
पाटोदा५,०५६
शिरूर कासार५,९२५
वडवणी४,९८०

उमेद अभियानांतर्गत समुदाय गुंतवणूक निधी, बँक लिकेज, प्रधानमंत्री सूक्ष्म योजना पीएमईच्या माध्यमातून माझ्या गटाने बँकेकडून दोन वेळा तीन लाख रुपयांचे कर्ज घेतलेले असून, त्यातून मसाला उद्योग सुरू केला. उमेदकडून पॅकेजिंग व लेबलिंगचे प्रशिक्षण मिळाल्याने माझ्या मसाला प्रोडक्टला आकर्षक रूप मिळालेले आहे. हा मसाला मुंबई सरस, गेवराईमधील ठोक व घाऊक विक्रेते तसेच मुंबई, पुणे, नाशिक, हिंगोली, बार्शी येथे पुरवठा करीत आहे. - शारदा काकडे, महिला उद्योजिका, राधाकृष्ण महिला स्वयंसाहाय्यता समूह, निपाणी जवळका, ता. गेवराई.

हे ही वाचा सविस्तर : Women Day Special: मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग

टॅग्स :शेती क्षेत्रमहिलामहिला आणि बालविकाससरकारी योजनाकेंद्र सरकारशेतकरी