Join us
Daily Top 2Weekly Top 5

इराण तणाव; भारताच्या खत आयात खर्चावर आणि सरकारी अनुदानावर परिणाम होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:22 IST

मध्यपूर्वेतील तणाव आणि ऊर्जा वाजारातील अस्थिरतेमुळे जागतिक खत बाजारात हालचाल वाढू लागली आहे. अलीकडील काही दिवसांत युरियासारख्या खतांच्या किमतींमध्ये डॉलरमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. या परिस्थितीचा भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेवर आणि अन्नधान्य किमतींवर काय परिणाम होऊ शकतो, याचा हा आढावा.

जागतिक शेतीव्यवस्थेत रासायनिक खतांचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासांनुसार आज जगात जेवढे अन्न उत्पादन होते, त्यातील सुमारे ४० ते ५० टक्के उत्पादन हे रासायनिक खतांच्या वापरामुळे शक्य झाले आहे.

त्यामुळे खतांच्या किमतीत होणारी वाढ ही थेट शेती खर्च, अन्नधान्य उत्पादन आणि शेवटी ग्राहकांच्या अन्नधान्य किमतींवर परिणाम करते. सध्या जगभरात खतांच्या किमतीमध्ये अस्थिरता दिसत आहे.

ऊर्जा दर, जागतिक राजकीय तणाव, पुरवठा साखळीतील अडथळे आणि अलीकडील इराणशी संबंधित तणावाची परिस्थिती हे त्यामागील महत्त्वाचे घटक आहेत.

ऊर्जा दर आणि खतांचे उत्पादन

• खतांच्या किमती वाढण्यामागील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ऊर्जा खर्च, विशेषतः नायट्रोजन आधारित खतांच्या उत्पादनासाठी नैसर्गिक वायू हा मुख्य कच्चा माल असतो. त्यामुळे नैसर्गिक वायुच्या किमती वाढल्या की, खत उत्पादनाचा खर्चही वाढतो.

• याशिवाय रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक खत पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर इराण आणि मध्यपूर्वेतील तणाव वाढल्याने व्रत बाजारातील अनिश्चितता आणखी वाढली आहे.

खतांचे प्रमुख प्रकार

जागतिक शेतीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारची पोषक तत्त्वे वापरली जातात.

• नायट्रोजन आधारित खते - युरिया, अमोनिया

• फॉस्फरस आधारित खते - डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट)

• पोटॅशियम आधारित खते - पोटॅश

ही आधुनिक शेतीची प्रमुख खते मानली जातात. या खतांचा पुरवठा काही मर्यादित देशांमध्ये केंद्रित आहे. रशिया, बेलारूस, चीन, मोरोक्को आणि मध्यपूर्वेतील काही देश हे जागतिक खत बाजारातील महत्त्वाचे उत्पादक मानले जातात.

जागतिक बाजारातील किंमतवाढ

 अलीकडील काही आंतरराष्ट्रीय बाजार अहवालांनुसार युरिया खतांच्या किमतीमध्ये अल्पावधीत लक्षणीय वाढ झाली आहे. उदाहरणार्थ इजिप्तमधील युरिया निर्यात बाजारात किंमत सुमारे ४८५ डॉलर प्रति टनवरून ६६५ डॉलर प्रति टन इतकी वाढल्याचे नोंदवले गेले आहे.

• काही आयात बाजारांमध्ये किंमत सुमारे ५१६ डॉलर प्रति टनवरून ६८३ डॉलर प्रति टन इतकी वाढल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच काही बाजारांमध्ये अल्पावधीत १५० डॉलर प्रति टनपर्यंत वाढ झाल्याचे दिसते.

• या वाढीमुळे जागतिक खत बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुढील धोरणात्मक आव्हाने

सध्याच्या परिस्थितीत मध्यपूर्वेतील तणाव, ऊर्जा बाजारातील चढउतार आणि जागतिक पुरवठा साखळी यांचा एकत्रित परिणाम खतांच्या बाजारावर होताना दिसत आहे. भारतासारख्या मोठ्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी याचा अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतो.

खत अनुदानाचा वाढता आर्थिक भार

• खत आयात खर्चात वाढ संभाव्य अन्न महागाई त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने देशांतर्गत उत्पादन वाढवणे, कच्च्या मालाचे विविध स्रोत विकसित करणे आणि संतुलित खत वापर धोरण राबविणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

• या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जाते, हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

• जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या काळात खतांचा पुरवठा सुरळीत ठेवणे, खतांवरील अनुदानाचा वाढता खर्च नियंत्रित ठेवणे आणि सामान्य जनतेसाठी अन्नधान्य महागाईवर नियंत्रण ठेवणे ही मोठी आव्हाने असणार आहेत.

भारतासाठी वाढती चिंता

• भारत हा जगातील सर्वात मोठ्या खत वापरणान्या देशांपैकी एक आहे. काही खतांचे देशांतर्गत उत्पादन होत असले तरी फॉस्फेट आणि पोटॅश या घटकांसाठी भारताला मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते.

• भारत युरिया, डीएपी, फॉस्फेट आणि पोटॅश बासारखी खते रशिया, सौदी अरेबिया, मोरोक्को, ओमान आणि इतर देशांकडून आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारातील दरवाढीचा परिणाम भारताच्या खत आयात खर्चावर आणि सरकारी अनुदानावर होण्याची शक्यता असते.

अन्नधान्य किमतींवर परिणाम

• खतांच्या किमती वाढल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम अन्नधान्य बाजारावरही दिसू शकतो, काहीवेळा शेतकरी खर्च वाढल्यामुळे खतांचा वापर कमी करतात, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

• दुसरीकडे उत्पादन खर्च वाढल्यामुळे अन्नधान्याच्या किमतीवर दबाव निर्माण होतो. अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते ऊर्जा दरवाढ खत महाग, शेती खर्च वाढ, अन्नधान्य महागाई असा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेत दिसून येतो.

(लेखक कॉंपरिट क्षेत्रातील जाणकार व व्यवस्थापन सल्लागार आहेत.)

हेही वाचा : भारतीय वारसा कायद्यानुसार हाताने लिहिलेले 'मृत्युपत्र' वैध ठरेल का? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Tension: India's fertilizer import costs and subsidies likely to rise.

Web Summary : Iran tensions may hike fertilizer prices, impacting India's import costs and subsidies. Rising energy costs, supply chain issues, and global instability contribute. India, reliant on fertilizer imports, faces potential food price hikes and increased government subsidy burden, posing challenges for farmers and consumers.
टॅग्स :खतेशेतकरीशेतीसरकारशेती क्षेत्र