Join us

कुशल कामाअभावी सुशिक्षित बेरोजगार वळले माती कामाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:25 PM

डिग्री घेतली, पोटासाठी रोहयोची वाट धरली

भंडारा जिल्ह्यातील बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण भागात विस्तारला आहे. ग्रामीण भागात रोजगारांच्या संधी नाहीत किंवा उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिक शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर जातात. यापासून उच्च शिक्षित तरुणसुद्धा सुटले नाहीत. कुशल कामाअभावी सुशिक्षित बेरोजगार माती कामावर असून बीए, बीकॉम तर कोणी बीएस्सी, टिकास, फावडे घेऊन दोस्ती रोहयोशी अशी स्थिती जिल्ह्यात दिसून येते.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच विविध कामे केली जातात. यामध्ये मजगी, तलाव, बोडी, शेततळे निर्मिती व रस्ता निर्मितीचा समावेश आहे. ही सर्व कामे अकुशल असल्याने योग्य दाम मिळत असल्यामुळे उच्च शिक्षित तरुणसुद्धा माती कामावर जातात. कामाच्या संधीचा फायदा घेतात. ग्रामीण भागात अधिकच रोजगाराच्या संधी नाहीत किंवा काम नसल्याने अनेक जण रोहयोची कामे सुरू होताच कामावर हजर होतात. त्यामुळे कुटुंबालाही आर्थिक मदत होते.

कामाच्या संधीचा फायदा घेतात

ग्रामीण भागात आधीच रोजगाराच्या संधी नाहीत किंवा काम नसल्याने अनेक जण रोहयोची कामे सुरू होताच कामावर हजर होतात. त्यामुळे कुटुंबालाही आर्थिक मदत होते.

डिग्री घेतली, पोटासाठी रोहयोची वाट धरली

आठ तोंडे, खाणार काय?

ग्रामीण भागात बहुतांश संयुक्त कुटुंब असतात. त्यामुळे सदस्य विविध प्रकारच्या कामावर जातात. या माध्यमातून कमाई करतात. आमच्या घरी आठ जण आहेत. कमावणारे तिघे जण असल्याने काय करणार, असे एका मजुराने सांगितले.

चार तोंडे, खाणार काय?

एका मजुराने सांगितले की, आमच्या घरात चार सदस्य आहेत. त्यापैकी आम्ही दोघेच कमावणारे असल्याने रोहयो कामावर जावे लागते. यामुळेच उन्हाळ्यातील दिवस आम्ही कसे-बसे काढतो. शासनाने उन्हाळाभर अशीच कामे सुरू ठेवावीत.

निम्म्यापेक्षा जास्त महिला

रोजगार हमी योजनेच्या कामावर महिला मजूर अधिक असतात. त्यामानाने पुरुष मजुरांची संख्या कमी असते. महिला मजूर माती वाहून नेण्याचे काम करतात.

रोहयोवर वृद्धांची संख्या जास्त

ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या कामावर अनेक ज्येष्ठ नागरिकही जातात. विशेष म्हणजे, ६० वर्षांवरील ज्येष्ठांना कामावर घेता येत नाही. तरीही त्यांना भुरळ असते.

पाण्यासाठी पायपीट

रोजगार हमी योजनेच्या कामावर गावातील मजुरांनाच स्वतः पाणी न्यावे लागते. पाणी संपल्यानंतर गावात किंवा शेतातील विहिरीकडे धाव घ्यावी लागत असते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

हेही वाचा - शेतकरी बांधवांनो भूक मंदावली, थकवा जाणवतोय; किडनीचा आजार तर जडला नाही ना?

टॅग्स :विदर्भबेरोजगारीशेतकरीशेती