आधार कार्ड हे आजच्या घडीला एक आवश्यक दस्तऐवज बनले आहे. ते जर चोरी झाले किंवा कुठे हरवले, तर खूप अडचण येऊ शकते.
जर तुम्हाला आधार नंबर आठवत नसेल, तर अशा परिस्थितीत समजत नाही की पुढे काय करावं किंवा कोणाची मदत घ्यावी. अशा वेळी तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाची मदत घेता येते.
सामान्यतः आधार नंबरच्या मदतीनेच हरवलेले किंवा चोरी झालेलं आधार कार्ड रिकव्हर करता येते. पण नंबर नसतानाही आधार कार्ड रिकव्हर करता येते.
कार्ड हरवले वा चोरी झाल्यास आधार नंबर शोधण्यासाठी ते मोबाइल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचा हेल्पलाइन नंबर १९४७ वर कॉल करा.
नंतर तुमची माहिती, जन्मतारीख आदी तपशील द्या. यानंतर ते तुम्हाला नोंदणीचा नंबर दिला जाईल. या नंबरच्या मदतीने आधार नंबर शोधू शकता. तसेच वेबसाइटवर रिट्राइव्ह यूआयडी/इआयडी हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
या दोघांपैकी एक पर्याय निवडून माहिती भरावी लागेल. आता मोबाईलवर आलेला ओटीपी आणि कॅप्चा कोड टाका. तुम्हाला एसएमएसद्वारे आधार नंबर मिळेल.
अधिक वाचा: विवाहित मुलीला वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळतो का? काय आहे नियम? वाचा सविस्तर