Join us
Daily Top 2Weekly Top 5

HSC Exam Result 2024: बारावीचा आज निकाल, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 11:30 IST

किती वाजता लागणार निकाल? या संकेतस्थळांवर पहता येणार..

बारावी बोर्डाचा आज निकाल जाहीर होणार असून महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. यंदा राज्यात १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून आज दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अधिकृत संकेतस्थळासह विविध संकेतस्थळांवर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा योग्य नोंदणी क्रमांक किंवा रोल नं व पासवर्ड भरणे आवश्यक राहणार आहे.

यंदा १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या अधिकृत सूचनेनुसार बारावी बोर्डाचा निकाल mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल तपासता येणार आहे.

अजून कोणत्या संकेतस्थळांवर तपासाल निकाल?

mahahsscboard.in

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

hsc.mahresults.org.in

टॅग्स :बारावी निकालशिक्षण