Join us

भूगर्भातील पाणीपातळी खोलात, विहिरींचे पुनर्भरण कसे करावे?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 26, 2024 3:53 PM

विहीर किंवा बोअरचे पाणी कमी झाल्यास नवीन विहीर खोदणे किंवा विहिरीची खोली वाढवणे हा त्यावरील उपाय नसून...

भूगर्भातील पाण्याची पातळी आटत चालली आहे. विहिरी कोरड्या टाक पडू लागल्या असून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामीण भागात आल्याचे दिसून येत आहे. अशा काळात शहरांमध्ये निरुपयोगी कोरड्या विहिरींमध्ये पाण्याचे पुनर्भरण केल्यास भूजल पातळी वाढू शकते. व पाण्याचे बाष्पीभवन रोखता येऊ शकते. 

विहीर किंवा बोअरचे पाणी कमी झाल्यास नवीन विहीर खोदणे किंवा विहिरीची खोली वाढवणे हा त्यावरील उपाय नसून पाणी कमी झाल्यास पुनर्भरण करून भूजल पातळी वाढवावी लागते असे तज्ञ सांगतात. 

मुळातच कमी झालेल्या भूजल पातळीत नवीन विहीर व बोर घेण्यासाठी जमिनीची भूजलक्षमता आणखीनच बिघडते. भूजलाचा अतिउपसा होतो आणि भूस्तर कोरडा पडतो. मान्सूनची चाहूल लागली की महाराष्ट्रात विहिरी खोदण्याच्य कामाला वेग येतो. पाणीटंचाईपासून वाचण्याच्या प्रयत्नात एकरी 40 ते 50 बोर आता घेतले जाऊ लागले आहेत. 

महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस जरी झाला तरी भूजल पातळी सरासरीपेक्षा खोल होत जाते. आजही महाराष्ट्रातील बहुसंख्य तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू नये भूजल पातळी ही खोलत जात असल्याचे चित्र आहे. यासाठी विहिरींचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे. 

कसे करावे विहिरीचे पुनर्भरण? 

  • भू-जल भरणाकरिता विहीर वापरण्यापूर्वी विहिरीचा तळ स्वच्छ करणे तसेच जमा झालेला गाळ काढणे आवश्यक आहे. भू-जल भरणाकरिता वापरण्यात येणारे पाणी रेतीमुक्त तसेच क्षारविरहित असावे. 
  • शक्यतो छताचे क्षेत्र १००० चौ.मी. पेक्षा जास्त असावे. विहिरीतील पाण्याचे पुन्हा-पुन्हा क्लोरिनेशन करण्याची गरज आहे. 
  • निरुपयोगी किंवा चालू स्थितीतील हातपंपाचा भूजल भरणाकरिता वापर. २०० ते ५०० चौ.मी. पर्यंत छताचे क्षेत्र असलेले बंगले /इमारती मोठ्या प्रमाणात पुनर्भरणासाठी उपयुक्त असलेल्या दिसून येतात. 
  • प्लास्टिक पाईपद्वारे छतापासून हातपंपापर्यंत पाणी वहनाची व्यवस्था किंवा चालू हातपंपाच्या सक्शन पाईपची जोडणी असल्यास व्हॉल्व्हची गरज असते अन्यथा व्हॉल्व्हशिवाय सक्शन पाईप व केसिंग यांमधील मोकळ्या जागेतून विंधन विहिरीत पाणी भरले जाईल याची व्यवस्था करावी लागते.  
  • भूजल भरण्यासाठी वापरावयाचे पाणी रेतीमुक्त असावे  
  • हातपंपातील पाण्याचे पुन्हा पुन्हा क्लोरीनेशन गरजेचे असते.  
  • विंधन विहिरी नलिका कुपांचा उपयोग पुनर्भरणासाठी होऊ शकतो.
टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पपाणीपाणी टंचाई