पुणे : पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेत पुणे परिमंडळात आतापर्यंत ३४ हजार ३१२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्याची क्षमता १७० मेगावॉट इतकी आहे.
या योजनेमुळे या ग्राहकांचे वीजबिल शून्य झाले आहे. या योजनेचा प्रसार घराघरांत करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडळाने कंबर कसली आहे.
त्यानुसार शुक्रवारी (दि. ८) रास्ता पेठ शहर मंडल, गणेशखिंड शहर मंडल आणि पुणे ग्रामीण मंडलातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांतर्गत महावितरणचे वीज कर्मचारी थेट गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन प्रसार करण्यात येणार आहे.
केंद्र सरकार सूर्यघर योजनेसाठी १ किलोवॉट प्रकल्पाला ३०,००० रुपये, २ किलोवॉट प्रकल्पासाठी ६०,००० रुपये, तर ३ किलोवॉट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८,००० रुपये इतके अनुदान देत आहे.
एका किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पातून दरमहा सरासरी १२० युनिट वीज तयार होते. सूर्यघर प्रकल्पासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून ९० टक्क्यांपर्यंत कर्जसुद्धा मिळते.
पंतप्रधान सूर्यघर योजनेला वीज ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी वीज कर्मचारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन माहिती पत्रके वाटतील आणि ग्राहकांना मिळणाऱ्या अनुदानाची माहिती देऊन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करतील. - सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण, पुणे
अधिक वाचा: हवामानात मोठा बदल; राज्यात 'या' ठिकाणी ९ ते ११ मे दरम्यान पुन्हा गारपिटीसह पावसाची शक्यता
Web Summary : Pune's Surya Ghar Yojana benefits 34,312 customers, potentially eliminating electricity bills. A 1kW project generates about 120 units monthly. Government subsidies and bank loans are available to encourage adoption.
Web Summary : पुणे की सूर्य घर योजना से 34,312 ग्राहकों को लाभ हुआ, जिससे बिजली बिल संभावित रूप से खत्म हो गया। एक 1kW परियोजना प्रति माह लगभग 120 यूनिट उत्पन्न करती है। अपनाने को प्रोत्साहित करने के लिए सरकारी सब्सिडी और बैंक ऋण उपलब्ध हैं।