Join us

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? घरबसल्या चेक करा आता तुमच्या मोबाईलवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:28 IST

sanchar saathi आता मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रण, फसवणुकीपासून संरक्षण आणि सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुलभ व प्रभावी सुविधा उपलब्ध झाली आहे.

भारतातील १२० कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या, विशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications-DoT) संचार साथी हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे.

मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आता मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रण, फसवणुकीपासून संरक्षण आणि सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुलभ व प्रभावी सुविधा उपलब्ध झाली आहे.

संचार साथी पोर्टल आणि अ‍ॅपवरील प्रमुख सुविधा◼️ संचार साथी पोर्टलवर 'Know Your Mobile Connections', 'Block Your Lost/Stolen Mobile' आणि 'Verify IMEI' या महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध आहेत.◼️ या सेवांद्वारे नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकांची माहिती तपासणे म्हणजेच त्यांच्या नावावर एकाच ओळखीसह किती कनेक्शन आहेत हे पाहणे.◼️ तसेच हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाइल डिव्हाइस IMEI ब्लॉक करणे, तसेच IMEI क्रमांक आणि डिव्हाइसची प्रामाणिकता पडताळणी करणे शक्य होते.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड कसे चेक कराल?◼️ तुमच्या मोबाईलमध्ये क्रोममध्ये किंवा इतर ब्राउझरमध्ये www.sancharsaathi.gov.in ही वेबसाईट सर्च करा.◼️ त्यानंतर Citizen Centric Services ह्या मेन्यूवर क्लिक करा.◼️ त्यांनतर तिसऱ्या क्रमांकाचा मेन्यू KNOW MOBILE CONNECTIONS IN YOUR NAME वर क्लिक करा.◼️ त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका.◼️ पुढे कॅप्चा टाका. Validate Captcha वर क्लिक करा.◼️ तुमच्या मोबाईलवर ओटीपी जाईल. तो ओटीपी खाली टाका आणि Login वर क्लिक करा.◼️ पुढील स्क्रीनवर तुमच्या नावाने किती सिमकार्ड आहेत ते मोबाईल नंबरसहित दिसतील.

डिजिटल युगातील नागरिकांचा साथीदारशासनाच्या या उपक्रमामुळे देशातील नागरिक डिजिटल युगात अधिक सुरक्षित, सजग आणि सशक्त बनत असून, संचार साथी हा उपक्रम नागरिकांच्या हिताचा खरा साथीदार ठरत आहे. अधिक माहितीसाठी www.sancharsaathi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

अत्यंत महत्वाचे◼️ नागरिकांनी आपल्या मोबाईल डिव्हाइसवरील अनावश्यक अ‍ॅप्स तत्काळ काढून टाकावेत आणि फोन नेहमीच नवीनतम सुरक्षा ॲपसह अपडेट ठेवणे गरजेचे आहे.◼️ नागरिकांनी दूरसंचार विभागाचे नागरिक-केंद्रित ‘संचार साथी’ हे अ‍ॅप डाउनलोड करून त्यातील सर्व उपयुक्त वैशिष्ट्यांचा वापर करावा.◼️ नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल भारतीय क्रमांकावरून येत असल्यास त्वरित टोल-फ्री क्रमांक १९६३ वर माहिती द्यावी.

अधिक वाचा: तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे का? हे ऑनलाईन कसे चेक कराल? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Check SIM cards on your name via mobile: Easy steps

Web Summary : Telecom Department's Sanchar Saathi portal helps users check SIMs registered in their name, block lost mobiles, and verify IMEI. Access the portal, enter your number, verify OTP, and view registered SIMs. Stay secure by removing unused apps and reporting suspicious international calls.
टॅग्स :मोबाइलसायबर क्राइमकेंद्र सरकारसरकारभारत