lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > उन्हाळ्यात उगवा घरचा पुदिना, महिनाभरात येतील भरपूर पानं; ही सोपी पद्धत पहा वापरून..

उन्हाळ्यात उगवा घरचा पुदिना, महिनाभरात येतील भरपूर पानं; ही सोपी पद्धत पहा वापरून..

Grow house mint in summer, plenty of leaves will come within a month; Check out this easy method using.. | उन्हाळ्यात उगवा घरचा पुदिना, महिनाभरात येतील भरपूर पानं; ही सोपी पद्धत पहा वापरून..

उन्हाळ्यात उगवा घरचा पुदिना, महिनाभरात येतील भरपूर पानं; ही सोपी पद्धत पहा वापरून..

उन्हाळा आता वाढू लागलाय. उन्हाच्या कडाक्यात थंडावा मिळावा यासाठी अनेकजण ताक पिण्यास पसंती देतात. ताकाच्या पेल्यात हिरवंगार पुदिन्याचं पानच ...

उन्हाळा आता वाढू लागलाय. उन्हाच्या कडाक्यात थंडावा मिळावा यासाठी अनेकजण ताक पिण्यास पसंती देतात. ताकाच्या पेल्यात हिरवंगार पुदिन्याचं पानच ...

शेअर :

Join us
Join usNext


उन्हाळा आता वाढू लागलाय. उन्हाच्या कडाक्यात थंडावा मिळावा यासाठी अनेकजण ताक पिण्यास पसंती देतात. ताकाच्या पेल्यात हिरवंगार पुदिन्याचं पानच केवढं ताजंतवानं वाटणारं, नाही का? 

पुदिना प्रकृतीनं थंड, पित्तनाशक समजला जातो. पुदिन्याचे याशिवायही अनेक औषधी व आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. वाढत्या उन्हाळ्यात तुम्हाला घरच्या कुंडीतही पुदिना लावता येऊ शकतो. या टिप्स ठरतील फायद्याच्या..

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा पुदिना तुम्ही घरच्या घरी उगवू शकता. त्यासाठी या सोप्या टिप्स ठरतील फायद्याच्या.

कुंडीत पुदिना लावायचाय?

  • कुंडीत पुदिना लावायचा असेल तर  बाजारातून पुदिन्याची जूडी आणा. त्यातील मुळे दिसत असणारी काडी निवडा
  • कुंडीमध्ये रेती, माती आणि शेणखताची एकसारखी मात्रा घ्या. व त्यात कोकोपीट मिसळा.
  • मातीमध्ये २ ते ३ इंच खोलीवर पुदिन्याची निवडलेली काडी लावा.
  • पुदिन्याला उगवण्यसाठी आर्दतेची गरज असते. त्यामुळे रोज दोन वेळा रोपाला पाणी देऊन हलक्या उन्हात कुंडी ठेवावी.
  • एका महिन्याच्या आत पुदिन्याला भरपूर पाने येऊ लागतील. त्यानंतर तुम्ही या पानांना तोडून वापरू शकता.
     

पुदिन्याचे आयुर्वेदिक फायदे

पुदीना त्याच्यातल्या गुणधर्मांमुळे केसांचा कोरडेपणा कमी करतो. ह्यामुळे केस गळणे आणि तुटणे कमी होते, ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या वाढू लागतात. पुदिना नियमित खात असाल तर केस गळती कमी होईल.

अपचन झालं असेल तर

पोट खराब झाल्यावर अनेकदा अपचन होते. ह्यामध्ये लिंबू, पुदीना आणि आल्याचा 100-100 मिली रस घ्या. त्यात 200 ग्रॅम गूळ घाला. शक्यतो चांदीच्या भांड्यात शिजवा. हे 20 मिलीच्या प्रमाणात थोडं थोडं खा. ह्यामुळे अपचनाची समस्या दूर होते.

तापामध्ये तापावर उपचार करण्यासाठी वापर

हंगामातील बदलामुळे ताप आल्यास पुदिन्याच्या पानांचा काढा प्या. तो ताप बरा करतो. याशिवाय पुदिन्याची चटणी बनवून खाऊ देणे देखील ताप बरा करते आणि तापामुळे भूक न लागणे. पुदीनाचे औषधी गुणधर्म तापापासून त्वरीत आराम देण्यात मदत करतात.

Web Title: Grow house mint in summer, plenty of leaves will come within a month; Check out this easy method using..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.