Join us

Grape Farmer Success : दोनवेळा उद्ध्वस्त झाल्यानंतरही गायके बंधूंनी फुलविला द्राक्षाचा मळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 18:24 IST

Grape Farmer Success : पारंपरिक शेतीला फाटा देत, सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी येथील गोविंद आणि मधुकर गायके या शेतकरी बंधूनी सीडलेस द्राक्षांची (Grape) लागवड करून एक नवा मार्ग दाखवला आहे.

Grape Farmer Success : पारंपरिक शेतीला फाटा देत, सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी येथील गोविंद आणि मधुकर गायके या शेतकरी बंधूनी सीडलेस द्राक्षांची (Grape) लागवड करून एक नवा मार्ग दाखवला आहे.

सुरुवातीला अपेक्षित उत्पन्न मिळालं असतानाही कोरोना महामारीमुळे त्यांना योग्य नफा मिळाला नाही. त्यानंतर दोन वर्षे अतिवृष्टीमुळे मळा कोलमडून पडला. मात्र, अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत, जिद्दीने पुन्हा उभे राहून त्यांनी पुन्हा मळा फुलविला. (Grape farming)

त्यांच्या मेहनतीचे फळ आज चांगल्या बहरलेल्या मळ्यात दिसत आहे. यावर्षीही चांगल्या उत्पन्नाची हमी आहे. निराशेच्या गर्तेत गेलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणा बनले आहेत. (Grape farming)

४० जणांना मिळाला रोजगार

गायके बंधूंनी हार न मानता पुन्हा कंबर कसली आणि बाग पुनर्निर्मित केली. यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिली. आणि द्राक्षांचे घड दीड ते अडीच किलोपर्यंत झाले. त्यांनी जवळपास ४० जणांना रोजगारही दिला आहे.

गायके बंधूंनी सांगितले की, यावर्षी गुणवत्ता उत्तम असल्यामुळे द्राक्षाचे भाव चांगले मिळण्याची शक्यता आहे आणि खर्च वजा जाता १७ ते १८ लाखांचे उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा आहे.

अस्मानी, सुलतानी संकटांचा मारा ! गायके बंधूंनी २०१९ मध्ये कडवंची, जिल्हा जालना येथून 'माणिक चमन' व 'सोनाका' (सीडलेस) या द्राक्ष वाणांची रोपे आणून १ हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबाग लागवड केली.

या बागेसाठी त्यांनी विहीर आणि कृषी विभागाच्या मदतीने शेत तलाव घेतला आणि योग्य व्यवस्थापन करीत बाग फुलवली. २०२० मध्ये पहिल्या उत्पन्नासोबत कोरोना महामारीमुळे अपेक्षित भाव मिळाला नाही.

२०२१ मध्ये त्यांची बाग बहरली आणि उत्पादन चांगले झाले. मात्र, २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तरीही, २०२३-२४ हंगामात त्यांनी परिश्रमाने बाग पुन्हा फुलविली.

द्राक्षांचे घड १.५ ते २ किलोपर्यंत वाढले आणि सुमारे १८ ते २० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते; परंतु २६ नोव्हेंबर २०२४ रात्री झालेल्या तुफान गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली होती.

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Market : मायबाप सरकार, हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा काटा हलणार कधी? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रद्राक्षेशेतकरीशेतीबुलडाणा