Join us

Gandul Khat Nirmiti : अमरनाथची गांडूळ निर्यातीची यशोगाथा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:15 IST

Gandul Khat Nirmiti : २०१५ मध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रावर हा प्रकल्पास सुरुवात करून अंदुरे यांनी गांडूळ खत निर्मितीमध्ये चांगले यश मिळवले आहे. वाचा त्यांची यशोगाथा

शिरूर कासार : उच्चशिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, इंजिनिअर आदी क्षेत्र न निवडता एक वेगळी वाट शोधून परदेशात गांडूळ निर्यातexport करण्याचा मान पाटोदा तालुक्यातील पारनेरचे अमरनाथ अंदुरे यांनी मिळविला आहे. नुकतेच त्यांनी ओमान येथे गांडूळ खतनिर्मितीGandul Khat Nirmiti कमी खर्चात कशी करता येते, या विषयावर मार्गदर्शन केले.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पारनेरचा अमरनाथ अंदुरे या तरुणाने कृषीचे शिक्षण घेऊन नोकरीच्या भानगडीत न पडता एक वेगळी वाट शोधली. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खालावून ती निकस होऊ लागली.

रासायनिक खताऐवजी जैविक खतOrganic शेतीचीFarm प्रत कायम ठेवेल हे जाणून अमरनाथने पारनेरसारख्या खेडेगावात गांडूळ व खतनिर्मितीत पहिले पाऊल ठेवले. सुरुवातीस अडचणी येत गेल्या, मात्र अडथळे पार करत अमरनाथने आज गांडूळ व खत निर्यातीच्या क्षेत्रात यश मिळवले आहे.

'नेचर ॲग्रो टेक'नावाने संस्था स्थापन करून २०१५ मध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रावर हा प्रकल्पProject सुरू केला. या प्रकल्पाचा प्रवास आता थेट ओमानपर्यंत पोहोचला आहे. अंदुरे यांनी नुकताच दहा दिवसांचा ओमान दौरा केला. तेथे त्यांनी कमी खर्चात गांडूळ खतनिर्मितीवर मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर प्राणी-पक्ष्यांचे वजन वाढविण्यास मदत करणारी काळी सैनिक माशीचे १०० ग्रॅम अंडी देऊन त्याचा उत्पादन प्रकल्पही प्रायोगिक तत्त्वावर सुरू करून दिला. गांडूळ निर्यातीतून झालेल्या ओळखीतून ओमान येथील व्यावसायिक मित्रांकडून अंदुरे यांना निमंत्रित करण्यात आले होते.

२०२१ मध्ये ४ हजार किलो जिवंत गांडूळ निर्यात केली होती; परंतु काही तांत्रिक बाबींमुळे त्यात नुकसान झाले. त्यानंतर २०२३ मध्ये १ हजार किलो गांडूळ निर्यात केली. ओमानमध्ये तुर्कीहून मागवलेले स्वयंचलित सहा गांडूळ खत बेड जास्त निधी गुंतवूनही फारसे उत्पादन मिळाले नव्हते.

अंदुरे यांनी ओमानमध्ये गेल्यावर तेथील उद्योजकांची भेट झाली. तेथील शेती, पाणी परिस्थिती, हवामानाची पाहणी केली. तेथे भारतीय पध्दतीने कमी खर्चात गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाचे मार्गदर्शन त्यांनी केले.

ओमानला २ हजार किलो जिवंत गांडूळ मागविण्यात आले. त्याचबरोबर काळी सैनिकी माशीबद्दल चर्चा झाली. त्यांनाही ५०० किलो जिवंत बीएसएफ लर्व्ह पाहिजे होते, मात्र ते पाठवणे अवघड होते. मी जाताना अवघे १०० ग्रॅम अंडी घेऊन गेलो. आणि त्यांना तिथे भारतीय पध्दतीने कमी खर्चात गांडूळ खत प्रकल्प आणि काळी सैनिकी माशी उत्पादन प्रकल्प सुरू करून दिला, असे अमरनाथ यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अमरनाथ यांनी आपल्या स्वतः च्या शेतात तयार केलेल्या गांडूळ खत प्रकल्पात वर्मी बेडची निर्मिती केली.या वर्मी बेडमध्ये कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. या प्रकल्पामध्ये त्यांचे कुटुंब एकत्र मिळून काम करतात. अमरनाथ यांच्या पत्नी खताची आणि गांडूळाची विक्री करण्यासाठी त्यांची मदत करतात.

या ठिकाणी तयार झालेले खत ते स्वतःच्या शेतात वापरतात. ऑर्डरप्रमाणे इतर शेतकऱ्यांना देखील या खताची विक्री केली जाते. त्यामुळे या परिसरात आता मोठ्या प्रमाणात शेतकरी सेंद्रियOrganic शेतीFarming करत आहेत.

ओमानमध्ये मिळाले प्रेम आणि सन्मान !

दहा दिवसांच्या काळात ओमानमधील सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याबदल्यात त्यांच्याकडून मिळालेले प्रेम आणि झालेला सन्मान यासह दिलेल्या काही भेटवस्तू माझ्यासाठी जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. शिक्षित आणि उच्चशिक्षित भारतीय तरुणांनी नेहमीच नव्या वाटेच्या शोधात राहून आपल्या देशाचा नावलौकिक वाढवावा, असा सल्ला अमरनाथ अंदुरे यांनी दिला.

हे ही वाचा सविस्तर :  Sendriya Carbon : मातीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? व तो कसा वाढवावा; सविस्तर पाहूया

टॅग्स :शेती क्षेत्रसेंद्रिय शेतीशेतकरीशेती