Pune : भारतातील पहिलेच आंतरराष्ट्रीय अॅग्री हॅकेथॉन आज पुण्यात पार पडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत या हॅकेथॉनच्या १६ विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, मागील ३ दिवसांपासून म्हणजेच १ जूनपासून पुण्यात अॅग्री हॅकेथॉन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य, कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालय पुणे यांच्या वतीने या हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाची तयारी मार्च महिन्यापासून सुरू झाली होती. प्रत्यक्ष हॅकेथॉनमध्ये देशभरातील ५५० पेक्षा जास्त स्टार्टअप, विद्यार्थी आणि कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील १५० कंपन्या किंवा स्टार्टअप प्रत्यक्ष हॅकेथॉनमध्ये दाखवण्यात आले होते.
तंत्रज्ञानाच्या वापरातून शेती सोपी व्हावी यासाठी ८ वेगवेगळ्या श्रेणीमध्ये अर्ज मागवण्यात आले होते. तर प्रत्येक श्रेणीमध्ये एक विजेता आणि एक उपविजेता ठरवण्यात आला आहे. यामध्ये विजेत्याला २५ लाखांचे तर उपविजेत्याला १५ लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. एकूण ७ श्रेणीमध्ये एकूण १४ विजेते आणि उपविजेते जाहीर करण्यात आले असून २ श्रेणीमध्ये प्रत्येकी २ उपविजेते जाहीर करण्यात आले असून अशा एकूण १६ तंत्रज्ञानांना बक्षीस मिळाले आहे.
श्रेणी आणि विजेते
शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरविजेता - Jyosh AI Solution - स्वयंचलित कापूस वेचणी यंत्रउपविजेता १) Zensit२) True Rice
माती, पाणी संवर्धन, सिंचन, माती आरोग्य व्यवस्थापन विजेता - Autofarmउपविजेता - HELIOT.AI
कृषी यांत्रिकीकरणविजेता - The Farm Garidanउपविजेता - 1)Revon 2)Harihar Agrotech
रोग व्यवस्थापनविजेता - Pestosys LLPउपविजेता - Detect to Protect
ऊर्जाएकही विजेता नाही
पोस्ट हार्वेस्ट तंत्रज्ञान, वेस्ट मॅनेजमेंटविजेता - HydroNIR Technologyउपविजेता - Friends of farmer - Solar Dehydrators
कृषी अर्थकारण, मार्केट लिंकेजविजेता - Origin Hash - Blockchainn Traceabilityउपविजेता - Trend Crafters - Crop Price and Market Trend
अन्यविजेता - Avyuktam Innovations - Smart Pesticide Sprayinng Botउपविजेता - Plantary Pro Systems