Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture Secretary V Radha : अखेर खरिपात मिळाले राज्याला नवे कृषी सचिव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 18:52 IST

राज्याचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी हा आदेश काढला आहे.

पुणे : प्रशासनाने राज्यातील प्रमुख आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून राज्याला आता नवे कृषी सचिव मिळाले आहेत. व्ही. राधा यांची प्रधान सचिव (कृषी), कृषी व पदुम विभागामध्ये बदली करण्यात आली आहे. तर राज्याचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी हा आदेश काढला आहे.

दरम्यान, राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांचीसुद्धा बदली करण्यात आली असून या पदावर राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांना आता विकास आयुक्त (असंघटित कामदार) या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. 

राज्याच्या कृषी सचिवपदी अनुप कुमार यांची बदली झाल्यानंतर आणि श्रीमती कुंदन यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला होता. ऐन खरिपात हे पद रिक्त होते पण त्यानंतर आता पूर्णवेळ कृषी सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी