Join us

शेतकऱ्यांनो सोन्याचे मोल असणाऱ्या शेतजमिनी, मातीमोल किमतीने विकू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:17 IST

सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका, असे आवाहन रायगड एमएमआरडीए केएससी नवनगरविरोधी समितीने शेतकऱ्यांना जाहीर पत्रकाद्वारे केले आहे.

उरण : सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका, असे आवाहन रायगड एमएमआरडीए केएससी नवनगरविरोधी समितीने शेतकऱ्यांना जाहीर पत्रकाद्वारे केले आहे.

तिसऱ्या मुंबईच्या निमित्ताने उरण पनवेल, पेण तर चौथ्या मुंबईच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील जमिनींना विशेष महत्त्व आहे.

त्यामुळे या सर्व तालुक्यात शेतकऱ्यांना, जमीन मालकांना विविध प्रलोभने दाखवून मोठ्या प्रमाणात जमीन कमी किमतीत विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

अनेकदा शेतकऱ्यांची या बाबतीत मोठ्या प्रमाणात फसवणूकसुद्धा झाली आहे. आता पुन्हा तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा सरकारने चंग बांधला आहे.

त्यासाठी काही दलाल दिशाभूल करुन त्यांना जमीन विकण्यास भाग पाडत आहेत. त्या विरोधात समितीने पाच वर्षे न्यायालयात आणि रस्त्यावर तीव्र लढा दिला आणि त्या प्रकल्पालाच हद्दपार करुन टाकले. तो लढा ऐतिहासिक होता. 

भूमिपुत्रांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न◼️ शासनाने २००३ पासून पाच वेळा उरण पनवेल पेण विभागात तसेच इतर विभागात विविध प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला आहे.◼️ २००६ साली तर रिलायन्सच्या महामुंबई एसईसझेडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी कवडीमोल किमतीने बळकाविण्याचा आणि भूमीपुत्र असलेल्या शेतकऱ्यांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न झाला.

अधिक वाचा: गाळ कसा तयार होतो? व त्याचे शेतीसाठी कसे फायदे होतात? वाचा सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीपीकसरकाररायगडमुंबईपनवेल