Join us

सोयाबीन काढणीला वेग, मळणी यंत्राचे भाडे परवडत नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 13:00 IST

काढणीनंतर त्याच शेतात पेरणार गहू व हरभरा...

हिंगोली तालुक्यातील बासंबा व परिसरात सोयाबीनकाढणीला वेग आला असून, शेतकरी यंत्राद्वारे सोयाबीनचीकाढणी करून घेत आहेत. सोयाबीन काढणीनंतर त्याच शेतात गहू व हरभरा पेरला जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परंतु यंत्राचा किराया जास्त लावत असल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडत नाही. परिणामी, शेतकरीवर्ग चिंतीत आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीन पेरणीला उशीर झाला. त्यामुळे सोयाबीन काढणीही उशिराने होऊ लागली आहे. दुसरे म्हणजे यावर्षी 'येलो मोझॅक सोयाबीनवर पडला होता. त्यामुळे उत्पादनही कमी होत आहे, असे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. गतवर्षी पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे सोयाबीन भरभरून आले होते. परंतु यावर्षी जून महिन्यापासूनच पावसाने खंड दिला. त्यामुळे वेळेवर पिकांना पाणी मिळाले नाही. आता यापुढे रबी हंगामातील पिकांची कशी जोपासणा करावी? हाही प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

पिकांसाठी दरवर्षी उसनवारी

चार महिने शेतात पिके चांगली येण्यासाठी काबाडकष्ट करावी लागत आहेत. परंतु त्या मानाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव काही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षीच शेतकऱ्यांना पिकांच्या फवारणीसाठी उसनवारी करावी लागत असल्याचे शेतकयांनी सांगितले.

टॅग्स :सोयाबीनशेतकरीकाढणीशेती