Join us

पैसे भरूनही सौर पंप मिळेना, शेतकऱ्यांकडून व्यक्त होतोय संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 3:33 PM

वीज समस्यांमधून सुटका मिळावी यासाठी सौर कृषी पंप शासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र परभणी जिल्ह्यात पैसे भरूनही शेतकऱ्यांना म्हणून ...

वीज समस्यांमधून सुटका मिळावी यासाठी सौर कृषी पंप शासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र परभणी जिल्ह्यात पैसे भरूनही शेतकऱ्यांना म्हणून महिने पंप मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. महावितरण प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसून येत आहे. 

वीज वितरण कंपनीच्या मार्फत तीन लाख वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. ग्राहकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी 10 उपविभागाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु महावितरण कडून ग्राहकांच्या समस्या वेळेत सोडविण्यात येत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. 

विजेच्या समस्या येऊ नयेत म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने सौर कृषी पंप शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली. त्यानुसार जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व कुसुम योजना अंतर्गत प्रस्ताव दाखल केले आहेत. प्रस्ताव दाखल करून वर्षभराचा कालावधी उलटला तरीही बहुतांश शेतकऱ्यांना कृषी पंपा विषयी कोणताही संदेश देण्यात आलेला नाही. 

महावितरणने द्यावे लक्ष

शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत महावितरण च्या माध्यमातून सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. त्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची रक्कम भरूनही आता महिनाभराचा कालावधी उलटला आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन महावितरण प्रशासन संबंधित एजन्सींना पंप देण्यासाठी आदर्श द्यावेत अशी मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

अर्थसंकल्पात मागेल त्याला कृषीपंपाची घोषणा

अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहे. यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पाच लाख 50 हजार नवीन सौर्य कृषी पंप बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :वीजशेतीपाणीपाटबंधारे प्रकल्प