युनूस नदाफ
पार्डी : अतिशय कमी श्रम असणारे पीक (Crop) म्हणून उसाच्या पिकाकडे पहिले जाते. परंतु, ऊस (Sugarcane) हे आळशी नव्हे तर काटेकोर व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक असल्याचे सिद्ध करत अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथील शेतकऱ्याने दोन एकरांत १२० टन उत्पन्न घेतले आहे.
अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी (Banana) आणि हळदीचे (Halad) उत्पन्न घेतात. परंतु मागील काही वर्षापासून हळदीच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय घट झाली असून आणि केळीवर अस्मानी व सुनामी संकट येत असल्याने केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
यावर उपाय म्हणून लक्ष्मण गिरी या शेतकऱ्याने दोन एकरामध्ये उसाची लागवड केली आहे. ८००५ जातीच्या उसाची लागवड केली आहे. या उसाला ५० कांडी आहे. उसाचे भरघोष उत्पन्न काढल्यामुळे त्यांच्या संसारात साखरेचा गोडवा वाढला आहे.
एकरी ६० ते ६५ टन उत्पन्न उच्चांकी ऊस उत्पादन घेतले आहे. त्यामुळे चोरंब्याच्या शेतकऱ्याच्या संसारात साखरेचा गोडवा वाढला आहे. अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी आणि हळदीचे उत्पन्न घेतात.
परंतु, मागील काही वर्षांपासून हळदीच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय घट झाली असून आणि केळीवर नैसर्गिक संकट येत असल्याने केळीचे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून लक्ष्मण गिरी या शेतकऱ्याने दोन एकरामध्ये उसाची लागवड केली. ८००५ जातीच्या उसाची लागवड केली असून, या उसाला ५० कांडी आहेत. तालुक्यात केळी, ऊसाची लागवड मोठी आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
* विशेष म्हणजे यावरच न थांबता आता एकरी ७० ते ७५ टन घेण्यासाठी त्यांनी कंबर कसली. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर केळी व हळदीपेक्षाही जास्त उत्पन्न काढता येते. याची प्रचिता लक्ष्मण गिरी यांनी दिली आहे.
* ८००५ जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लागवड करण्यात आली असून, वेळेवर खत व पाणी देणे उसाच्या अंतर्गत मशागत करणे, हे काम काटेकोर पद्धतीने करून दोन एकरांत १२० टन उसाचे उत्पन्न काढले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Shet tale Anudan : शेततळे योजनेसाठी अनुदान अर्ज करताय; 'या' गोष्टी नक्की वाचा