Join us

Farmer Success Story: पिवळ्या नव्हे काळ्या हळदीचा घोडेकर यांचा यशस्वी प्रयोग वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 10:26 IST

Farmer Success Story: अर्धापूर येथील शेतकरी प्रकाश घोडेकर यांनी पारंपरिक शेतीसोबतच नवीन प्रयोग म्हणून आपल्या शेतात काळ्या हळदीची (black turmeric) सेंद्रिय पद्धतीने लागवड करून तीन क्विंटल उत्पादन काढले. यातून त्यांना तीन लाखांचे उत्पन्न झाले आहे. त्यांचा हा प्रयोग इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

गोविंद टेकाळे

अर्धापूर येथील शेतकरी प्रकाश घोडेकर यांनी पारंपरिक शेतीसोबतच नवीन प्रयोग म्हणून आपल्या शेतात काळ्या हळदीची (black turmeric) सेंद्रिय पद्धतीने लागवड करून तीन क्विंटल उत्पादन काढले. यातून त्यांना तीन लाखांचे उत्पन्न झाले आहे. त्यांचा हा प्रयोग इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

येथील शेतकरी प्रकाश विश्वनाथ घोडेकर याची अर्धापूर शिवारातील ४६१ गटात शेती आहे. ते आपल्या शेतात नेहमी केळी, सोयाबीन, गहू पिवळी हळद आदी पिकांची लागवड करतात.

काळ्या हळदी संदर्भात माहिती मिळाली असता त्यांनी ७०० रुपयात २०० ग्राम काळ्या हाळदीचे (black turmeric) बेणे खरेदी केले. सतत तीन वर्षे त्याची लागवड करत त्याचे अधिकाधिक बेणे तयार केले. 

मागील वर्षी त्यांनी एक क्विंटल बेण्याची लागवड केली. त्यास शेणखत, गांडूळखत, लिंबोळी अर्क, गोमूत्र फवारणी करत पिकाची जोपासना केली. आता एकूण तीन क्विंटल काळ्या हाळदीचे (black turmeric) उत्पादन होत आहे.

त्यांच्याकडून परिसरातील डॉक्टर, शेतकरी हजार रुपये प्रति किलो दराने काळ्या हळदीची खरेदी करत आहेत. याविषयी माहिती मिळाल्याने अनेक शेतकरी त्यांच्याकडे येऊन या हळदीची पाहणी करून माहिती घेत आहेत.

आयुर्वेदात औषधीसाठी काळ्या हळदीला (black turmeric) महत्त्व आहे. तर रक्तदाब, मधुमेह व कर्करोगावर गुणकारी काळ्या हळदीचा वापर सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषधी व इतर औषधीसाठी केला जातो.

बाजारपेठ व माहितीमुळे शेतकरी वंचित

काळ्या हळदीला चांगली बाजारपेठ कुठे आहे चांगला भाव कुठे मिळतो व याचे बेणे कुठे मिळते. यासंदर्भात तेवढी माहिती उपलब्ध नाही. कृषी विभागाने या विषयी जनजागृती करावी, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा औषधी पिकांच्या लागवडीसाठी शासनाने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. - प्रकाश घोडेकर, प्रगतीशील शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story: कोठारीच्या माळरानावर बहरली गाडगे यांची नफ्याची शेती वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीनांदेड