Join us

Farmer Success Story : कन्नावारांनी टरबूज, खरबुजातून केली लाखो रुपयांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:38 IST

Farmer Success Story : आखाडा बाळापूर येथील प्रगतशील शेतकरी राजेश धोंडोपंत कन्नावार हे गेल्या दोन वर्षापासून शेतात विकसित तंत्रज्ञानाचा वापर करत टरबूज आणि खरबुजांचे उत्पादन घेत आहेत. त्यांना एकरी ३० टन उत्पादन मिळविले.

रमेश कदम

शेती परवडणारी नाही, शेतमालाला भाव नाही, अशी ओरड सातत्याने ऐकू येते. परंतु, बाळापूर येथील शेतकऱ्याने योग्य नियोजन व सातत्यपूर्ण कष्टाच्या बळावर घेतलेले टरबूज व खरबुजांचे (watermelon and melon) उत्पादन जोरदारपणे आले आहे.

टरबूज, खरबुजांची गुणवत्ता पाहून त्यांना दिल्लीकरांची पसंती मिळाली आहे. दिल्लीचे व्यापारी बाळापूरच्या शेतातून टरबूज, खरबुजाच्या गाड्या भरून दिल्लीकडे घेऊन गेले. त्यावर दिल्लीकरांची पसंतीची मोहर उमटल्याने शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज झाले, असेच म्हणावे लागेल.

आखाडा बाळापूर येथील प्रगतशील शेतकरी राजेश धोंडोपंत कन्नावार हे गेल्या दोन वर्षापासून शेतात विकसित तंत्रज्ञानाचा वापर करत टरबूज आणि खरबुजांचे उत्पादन घेत आहेत. त्यांना एकरी ३० टन उत्पादन मिळविले. (watermelon and melon)

वेगळ्या जातीची व्हरायटी वापरत त्यांनी टरबुजांचे उत्पादन घेतले. यावर्षी योग्य निगा राखत व सातत्यपूर्ण कष्टाची साथ मिळत गेली.(watermelon and melon)

एकरी ३० टन एवढे टरबुजाचे उत्पादन झाले असून, एकेक फळ आठ किलो भरत आहे. पाच किलो ते आठ किलो अशा वजनाची फळे पिकल्याने आणि त्यात नैसर्गिक गोडवा असल्याने या फळाला दिल्लीकरांनी पसंती दर्शविली आहे.(watermelon and melon)

दिल्लीतील व्यापारी शेतात येऊन गाड्या भरून टरबूज आणि खरबूज विक्रीसाठी घेऊन गेले आहेत. टरबूज अतिशय लालबुंद व गोड निघत असल्याने पाच किलो ते आठ किलो वजनाची फळे निवडून नेण्यात आली.(watermelon and melon)

खरबुजाचेही पीक मोठ्या प्रमाणावर आले आहे. टरबूज, खरबुजाचे उत्पादन वाढले आणि दिल्लीकरांची बाजारपेठ मिळाल्याने बाळापूरच्या शेतकऱ्याचे समाधान झाले आहे.

परिसरातील अनेक शेतकरी हे उत्पादन पाहण्यासाठी शेतात भेट देत आहेत. राजीव धोंडोपंत कन्नावार व नितीन कन्नावार यांनी टरबूज, खरबुजाचे विक्रमी उत्पादन घेत लाखोंची कमाई केली आहे. साडेतीन महिन्यांतच हे पीक आले असून, बाजारपेठ मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.(watermelon and melon)

उत्पादित माल गुणवत्तापूर्ण

रमजान महिन्याच्या उपवासाच्या काळात टरबूज आणि खरबूज आले पाहिजे, असे नियोजन करून लागवड केली. कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न करता टरबूज आणि खरबुजाचे उत्पादन घेतले. पाच ते आठ किलो वजनाची फळे अत्यंत रुचकर लागत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या व्यापारपेठेत फळांना मागणी वाढली आहे. - राजीव धोंडोपंत कन्नावार, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Women Day Special: मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीनांदेड