Join us

Farmer Loan: शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकाराच्या दारी का जावे लागते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 17:46 IST

Farmer Loan: शेती बेभरवशाची झाल्याने वर्षभरात ९६ हजार शेतकऱ्यांना सावकाराच्या दाराचे उबंरठे झिजवावे लागले. शेतकरी आपली आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सावकराकडे जावे लागते. वाचा सविस्तर (savkari karj)

गजानन मोहोड

शेती बेभरवशाची झाल्याने वर्षभरात ९६ हजार शेतकऱ्यांना सावकाराच्या दाराचे उबंरठे झिजवावे लागले. यामध्ये मार्चअखेर ६३५ - परवानाधारक सावकारांनी १,९१,२७१ शेतकऱ्यांसह आर्थिक अडचणीतील नागरिकांना २५४०८.५३ कोटींचे कर्जवाटप केले आहे. (savkari karj)

शिवाय हजारो अवैध सावकारांनी मनमानी व्याजाने वाटलेले कर्ज (savkari karj) शेकडो कोटींच्या घरात आहे.(Farmer Loan)

बँकांद्वारे कर्जवाटपात सिबिल स्कोअर पाहिला जातो, शिवाय जास्तीची कागदपत्रेही मागितली जातात. अनेकदा शेतकऱ्यांजवळ पुरेशी कागदपत्रे नसतात.(Farmer Loan)

बँकांद्वारे कर्जवाटपात दिरंगाईचे प्रकार होतात. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना सावकाराच्या (savkari karj) दारी जावे लागते. सहकार विभागाद्वारे ५०० रुपयांत - सावकारीचा परवाना मिळत असल्याने जिल्ह्यात सावकारांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे.

सद्यः स्थितीत जिल्ह्यात ६३५ परवानाधारक सावकार आहेत. परवानाधारक सावकारांना कृषी कर्ज वाटपास मनाई असली तरी बिगर कृषी कर्ज, तारण कर्ज व बिगर तारण कर्ज या प्रकारांमध्ये जिल्ह्यात रेकार्डवर २५४ कोटींचे कर्जवाटप केले आहे.(Farmer Loan)

कित्येक परवानाधारक सावकार अवैध सावकारीत गुंतल्याने त्यांचे व इतर विनापरवाना सावकारांचे कर्जवाटप (savkari karj) याची माहितीच उपलब्ध होत नाही.

कर्जवाटपाचे दर (प्रतिवर्ष)

शेतकऱ्यांकरिता

तारण कर्ज ९ टक्के

विनातारण कर्ज १२ टक्के

शेतकऱ्यांशिवाय 

तारण कर्ज १५ टक्के

विनातारण कर्ज १८ टक्के

सोने, चांदी प्रॉमिसरी नोटवर देतात कर्ज

जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँका शेती तारणावर कर्ज देतात. या व्यतिरिक्त बिगर शेती कर्ज, तारण कर्ज व बिगर तारणी कर्ज हे सोने, चांदी व प्रॉमिसरी नोटवर दिले जाते असे सहकार विभागाने सांगितले.

सावकारांचे फुटले पेव, अमरावतीत सर्वाधिक

पेसा क्षेत्रातील चिखलदरा तालुका वगळता जिल्ह्यात ६३५ परवानाधारक सावकार आहेत. यामध्ये सर्वाधिक २३७ अमरावती तालुक्यात, अचलपूर १४९, मोर्शी ३३, अंजनगाव २३, धामणगाव रेल्वे २८, वरुड ४०, धारणी २०, नांदगाव खंडेश्वर १४, चांदूररेल्वे ९, चांदूरबाजार ४२, तिवसा १८ व दर्यापूर तालुक्यात १४ सावकार आहेत. या सर्वसावकारांना दरवर्षी परवाना नुतनीकरण करणे बंधनकारक आहे.

शेतकरी कर्ज कशासाठी वापरले जाते?

* पिकासाठी लागणारा खर्च

* खत, बियाणे, कीटकनाशके आणि इतर शेती संबंधित खर्चासाठी.

परवानाधारक सावकारांचे कर्जवाटप (मार्च २५ अखेर)

बिगर कृषी कर्जदार९५६३५
वाटप केलेले कर्ज१२७०४.३७ लाख
तारण कर्जदार९४८८२
वाटप केलेले कर्ज१२४८६.९९ लाख
विनातारण कर्जदार७५३
वाटप केले कर्ज२१७.१७ लाख
एकूण वाटप कर्जदार१,९१,२७१
सावकारांचे कर्जवाटप२५४०८.५३ लाख

परवानाधारक सावकारांनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुद व शासन निर्णय तथा वेळोवेळी शासनाकडून निर्गमित होणाऱ्या परिपत्रकानुसार करावे. - शंकर कुंभार, जिल्हा उपनिबंधक

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Awak: बाजारात शेतमालाची आवक का घटली; जाणून घ्या काय आहे कारण

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीअमरावती