Join us

मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षणक्रमास प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 17:40 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखे मार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षणक्रमांची प्रवेश मुदत आता २३ जून २०२४ पर्यंत वाढविली आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखे मार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षणक्रमांची प्रवेश अर्ज भरण्याची मुदत मुदत 19 जून 2014 पर्यंत होती.  विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सदर प्रवेश प्रक्रियेपासून विद्यार्थी वंचित राहू नये, या उद्देशाने कृषी शिक्षणक्रम प्रवेशाची मुदत दिनांक 23 जून 2024 पर्यंत वाढविण्यास मान्यता दिली असून जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कुलगुरूंनी केले आहे.

माळी प्रमाणपत्र शिक्षणक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरुमहाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून नववी उत्तीर्ण विद्यार्थांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेमार्फत माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरु केला आहे. सदर शिक्षणक्रम मुक्त विद्यापीठाने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील विविध ६५ कृषी अभ्यास केंद्रावर चालविला जातो. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम मराठी भाषेतून असून, हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून नववी उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो, अशी माहिती प्रा. (डॉ.) माधुरी सोनवणे, संचालक, कृषिविज्ञान विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि डॉ. भागवत राजाभाऊ चव्हाण, शैक्षणिक संयोजक कृषिविज्ञान विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला http://ycmou.digitaluniversity.ac OR http://www.ycmou.ac.in भेट द्यावी.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशिक्षण