Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिबट हल्ले रोखण्यासाठी आले पूर्वसूचना यंत्र, कसे करते काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 10:18 IST

जुन्नर तालुक्यात मानव-बिबट संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतोय. यावर एक उपाय म्हणून बोरी बुद्रुक येथील साईनगर येथे जुन्नर विभागाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वन्य प्राणी पूर्व सूचना यंत्र बसविण्यात आले आहे.

राजुरी : जुन्नर तालुक्यात मानव-बिबट संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतोय. यावर एक उपाय म्हणून बोरी बुद्रुक येथील साईनगर येथे जुन्नर विभागाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वन्य प्राणी पूर्व सूचना यंत्र बसविण्यात आले आहे.

या यंत्रामध्ये लाइट व्यवस्था व कॅमेरा बसविला असून, दिवसा ५०० मीटर, तर रात्रीच्या वेळी १०० मीटरपर्यंत वन्यप्राण्यांच्या हालचालीचे वेध हे यंत्र घेते, परंतु या यंत्राताच्या कॅमेरा फक्त अस्वल, बिबट, वाघ दिसल्यावर हे यंत्र सायरन देऊन संबंधित परिसरातील नागरिकांना धोक्याची सूचना देते.

या यंत्रणेमुळे आजूबाजूच्या परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसून आल्यास संबंधित कंपनी, वनाधिकारी, रेस्क्यू मेंबर यांना संदेश व चित्रफित अथवा फोटो जातो. या संदेशाच्या माध्यमातून वनाधिकारी फोन करून संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करत असतात व ताबडतोब त्या ठिकाणी रेस्कू टीम पाठविले जाते. त्यामुळे परिसरातील लोकांना बिबट आल्याची सूचना किंवा माहिती मिळते.

वनविभागाचा प्रयोगहे यंत्र वनविभागाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले असून, यामध्ये अजून कोणत्या सुधारणा करता येतील यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली आहे. या यंत्राद्वारे जो संदेश सूचना मिळते ती संबंधित कंपनी, वनाधिकारी व रेस्क्यू टीमकडे जाते तो संदेश स्थानिक पातळीवर पोहोचेपर्यंत दहा ते पंधरा मिनिटे जातात दरम्यानच्या काळात बिबट्याचा हल्ला करु शकतो.

अधिक वाचा: Catla Fish कोयना नदीपात्रात सापडला २५ किलोचा कटला मासा

टॅग्स :जंगलवनविभागशेतीआर्टिफिशिअल इंटेलिजन्स