१ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. पीकविमा, हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई-पीकपाहणी आवश्यक असून, शेतकरी स्तरावरील नोंदणीस अवधा एक दिवस उरला आहे. नुकसानभरपाई मिळण्यासाठी बंधनकारक आहे.
ई-पीक पाहणी यंदाच्या रब्बी हंगामापासून ई-पीक पाहणी नोंदीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) Digital Crop Survey मोबाइल अॅपच्या माध्यमातून शेतकरी व सहायक स्तरावरून पिकांची नोंद केली जाणार आहे.
सध्या शेतकरी स्तरावरून ई-पीक पाहणी केली जात आहे. शेतकरी स्तरावरून नोंदणीसाठी १५ जानेवारीपर्यंतची मुदत आहे. यात शेतकऱ्यांना शेतात जाऊनच मोबाइल अॅपमध्ये पिकांचे फोटो अपलोड करून माहिती भरावी लागत आहे.
ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचण आल्यास मदतीसाठी सहायकांची नियुक्ती केली आहे. शेतकरी स्तरावरील ई- पीक पाहणी कालावधी संपल्यानंतर उर्वरित खातेदारांची ई-पीकपाहणी कर्मचाऱ्यांमार्फत डीसीएस मोबाइलद्वारे त्यांच्या लॉगिनने पूर्ण करणार आहेत.
गाव नमुना १२ वर होईल नोंद• शेतकरी स्तरावरून नोंदवण्यात आलेल्या पीक नोंदीपैकी १०० टक्के पडताळणी सहायक स्तरावरून करण्यात येणार आहे.• सहायक स्तरावरून नोंदविण्यात आलेल्या नोंदीची १०० टक्के पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत होणार आहे.• त्यानंतर ई-पीक पाहणी गाव नमुना १२ वर प्रतिबिंबित करण्यात येईल.
अधिक वाचा: E-Peek Pahani : नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये कशी कराल पीक पाहणी? वाचा सविस्तर