Join us

नोंदणी व मुद्रांक विभागातील दस्त हाताळणी शुल्कात वाढ; आता किती आकारली जाणार फी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:02 IST

नोंदणी विभागाचे बहुतांश कामकाज हे नागरिकांशी निगडित व लोकाभिमुख असल्याने, सर्व कामकाज कायम सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने, तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याकरिता राज्यभर नोंदणी विभागाचे मोठे जाळे आहे.

नोंदणी विभागाचे बहुतांश कामकाज हे नागरिकांशी निगडित व लोकाभिमुख असल्याने, सर्व कामकाज कायम सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने, तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याकरिता राज्यभर नोंदणी विभागाचे मोठे जाळे आहे.

जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावर मदत यंत्रणा (Support System) कार्यान्वित असून त्यामध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्क व सर्व्हर विषयक कुशल तांत्रिक मनुष्यबळ नियुक्त केले आहे.

या मनुष्यबळावरील खर्चामुळे संगणकीकरणाच्या खर्चामध्ये पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली आहे. सन २००२ नंतर हार्डवेअर व त्याची देखभाल, मनुष्यबळ आणि कंझ्यूमेबल्स यांच्या दरात वाढ झाल्याने त्यावरील खर्चात देखील वाढ झाली आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयांच्या संख्येत सन २००१ नंतर आतापर्यंत सुमारे २०० ने वाढ झाली असून सन २००१ नंतरच्या संगणकीकरणांतर्गत येणाऱ्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कंझ्यूमेबल्स, मनुष्यबळ यांच्या दरात वाढ झाली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागास 'बांधा, वापरा, हस्तांतरण करा' या तत्त्वावर खाजगीकरणाच्या माध्यमातून संगणकीकरण करणे, संगणकीकरणाअंतर्गत येणाऱ्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर कंझ्यूमेबल्स, मनुष्यबळ यांच्या दरात वाढ झालेली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील खाजगीकरणाच्या माध्यमातून येणारा खर्च भागविण्याकरिता दस्त हाताळणी शुल्क रु.२०/- वरुन रु.४०/- इतके निश्चित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

अधिक वाचा: शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद आता मिटणार, दस्त अदलाबदलीसाठी आला हा पर्याय; वाचा सविस्तर

टॅग्स :महसूल विभागसरकारशासन निर्णयराज्य सरकारऑनलाइन