Join us

Cooperative Commissioner : दिपक तावरे यांची राज्याचे सहकार आयुक्तपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 13:18 IST

विभागाला पूर्णवेळ आयुक्त मिळाल्यामुळे सहकार विभागातील कामाला गती मिळणार आहे.

पुणे :  राज्याला नवे सहकार आयुक्त मिळाले असून बारामती तालुक्यातील दिपक तावरे यांची सहकार आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आलेले आहेत. त्यांनी प्रशासनात विविध पदे भूषविली आहेत.

 प्रशासकीय अधिकारी अनिल कवडे यांनी सहकार आयुक्तपदाचा कार्यभार बराच काळ सांभाळला होता. त्यानंतर त्यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.  दरम्यान, आता पुन्हा दिपक तावरे यांच्याकडे सहकार आयुक्तपदाची धुरा आली आहे. विभागाला पूर्णवेळ आयुक्त मिळाल्यामुळे सहकार विभागातील कामाला गती मिळणार आहे.

दरम्यान, दिपक तावरे यांनी सुरूवातील पणन संचालक म्हणून काम केले होते. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका आयुक्त, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, साखर आयुक्तालयात सहसंचालक, पुणे विभागीय सहनिबंधक या पदावर त्यांनी काम केले आहे.

तर राज्य कामगार विमा योजना येथे आयुक्त आणि पुणे यशदाचे उपमहासंचालक पदी नियुक्ती झाली होती पण येथे ते रूजू झाली नसल्याची माहिती आहे. त्यांनी समृद्धी महामार्गावर लॉजिस्टिक पार्कता महत्त्वाचा प्रकल्प राबवला होता.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी