Join us

Crop Insurance Scam: सीएससी केंद्र चालकांना बसला दणका; परभणी जिल्ह्यात मोठी कारवाई वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:51 IST

Crop Insurance Scam: परभणी जिल्ह्यात १३ हजार शेतकऱ्यांचा नावे ३० हजार हेक्टरवरील पिकांचा विमा बोगस (Bogus Crop Insurance) भरला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने १२१ सीएससी केंद्रावर कार्यवाही करण्यात आली. वाचा सविस्तर माहिती

परभणी जिल्ह्यात १३ हजार शेतकऱ्यांचा नावे ३० हजार हेक्टरवरील पिकांचा विमा बोगस (Bogus Crop Insurance)भरला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने १२१ सीएससी केंद्रावर कार्यवाही करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार प्रशासनाने १२१ आपले सरकार सेवा केंद्रांचा (CSC Center) परवाना रद्द केला आहे. ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

राज्य शासनाने सर्व समावेशक पीकविमा योजना अंमलात आणली. त्यामुळे जिल्ह्यात पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून आपली पिके विमा कंपनीकडे संरक्षित करता येऊ लागली आहेत.

मात्र दुसरीकडे या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना ऐवजी बोगसगिरी करणाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे उजेडात आले. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात १३ हजार शेतकऱ्यांचा जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील विमा हा बोगस भरला असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने कार्यवाही करण्यास सुरुवात केली. कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे या १२१ आपले सरकार सेवा केंद्रातून हा विमा भरला आहे.

पहावे ते नवलच; परजिल्ह्यातील ५८ केंद्र

* पीक विमा योजनेंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामात १३ हजार शेतकऱ्यांच्या नावे ३० हजार हेक्टरवरील पिकांचा विमा बोगस काढल्याचे समोर आले.

* विशेष बाब म्हणजे परभणी जिल्ह्यापेक्षा बाहेरच्या जिल्ह्यातील तब्बल ५८ केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक बीड, नांदेड, पुणे, लातूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, चंद्रपूर, जालना, लातूर, सातारा, ठाणे कल्याण या जिल्ह्यातील सीएससी केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला.

* या जिल्ह्यातील केंद्रांनी परभणी जिल्ह्यात विमा भरल्याचे समोर आले.

पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत बोगस विमा भरल्याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने १२१ केंद्रांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर या केंद्रांचा वरिष्ठांच्या सूचनेनुसार परवाना रद्द करण्यात आला आहे. पुढे एखाद्या केंद्राने केला तर त्याचा परवाना रद्द केला जाणार आहे. - सोमनाथ तवार, जिल्हा व्यवस्थापक, सीएससी केंद्र

परभणी जिल्ह्यातील ४४ केंद्र केले ब्लॉक

* परभणी जिल्ह्यामध्ये प्रशासनाने ४,६८८ आपले सरकार सेवा केंद्राची नोंदणी केली. त्यापैकी जिल्ह्यात २,५६८ केंद्र सध्या सुरू आहेत.

* यातील ४४ केंद्रांनी बोगस विमा भरल्याचे समोर आले.या केंद्रांवर सीएससीच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला

* ३० हजार हेक्टरवील विमा बोगस भरल्याचे आले होते समोर होते त्या प्रकरणी ही मोठी करवाई करण्यात आली.

तालुकानिहाय रद्द करण्यात आलेले सीएससी सेंटर

गंगाखेड०५
जिंतूर१२
पालम०१
परभणी०८
पाथरी०५
सोनपेठ१३

हे ही वाचा सविस्तर : Bogus Crop Insurance : बोगस पीक विमा प्रकरणी 'सीएससी'ना अभय का? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रपीक विमाशेतकरीशेती