Join us

Crop Insurance : खरिपातील पीकविमा भरताय? 'या' दोन गोष्टी महत्त्वाच्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 21:33 IST

राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून राज्यातील शेतकर्‍यांनी पेरण्या आणि लागवडीला सुरूवात केली आहे.

Kharip Crop Insurance : राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून राज्यातील शेतकर्‍यांनी पेरण्या आणि लागवडीला सुरूवात केली आहे. यंदाच्या खरीप हंगामातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज करण्यास सुरूवात केली आहे. पण पिकविम्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी बँक पासबुक आणि आधार कार्डसंदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 

दरम्यान, मागच्या खरीप हंगामात १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी १ रूपयांत पीक विमा या योजनेचा लाभ घेतला होता. यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना १ रूपयांत पीकविमा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पिकविमा भरण्यासाठी pmfby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा सीएससी केंद्रावर विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.

कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?पिकविमा अर्ज करताना अर्जावरील नाव आणि आधारकार्डवरील नाव सारखं असायला पाहिजे. त्याशिवाय या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावरील नावसुद्धा आधारकार्डशी मिळतंजुळतं असायला पाहिजे. या खात्याला आधार कार्ड लिंक असायला हवे. तर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाची नोंदणी ई-पीकपाहणी करून घेणे गरजेचे आहे. 

आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, आठ अ, पीकपेरा स्वयंघोषणापत्र

अर्ज करण्याची अंतिम मुदत - १५ जुलै

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकपीक विमा