Join us

Crop Insurance : शेतकऱ्यांनो पीक विमा अर्जाला सुरूवात; फार्मर आयडी काढून घ्या! ही आहे शेवटची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 21:35 IST

यंदाच्या खरीप हंगामातील पीक विमा अर्जाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा अर्ज भरून घ्यावेत.

Crop Insurance :  यंदाच्या खरीप हंगामातील पिक विमा अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. राज्य सरकारने यंदा एक रूपयात पीक विमा योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. यासोबतच पीक विम्याचे निकषही सरकारकडून बदलण्यात आले आहेत. तर यंदाच्या खरिपातील पिकांसाठीचे विमा अर्ज शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भरून घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी महत्त्वाचा असून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही अशा शेतकऱ्यांनीही लवकरात लवकर अॅग्रीस्टॅक योजनेत नाव नोंदवून फार्मर आयडी काढून घ्यावा. 

पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंत विविध नैसर्गिक घटकांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळते. तर यामध्ये पावसामधील खंड, कीड, रोगांचा प्रादुर्भाव, पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन अशा वेगवेगळ्या निकषांचा सामावेश आहे.

पीक विमा योजनेमध्ये सामाविष्ट पिकेभात, नाचणी, ज्वारी, बाजरी, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, भुईमूग, कारळे, मूग, कांदा, तीळ आणि तूरपीक निहाय आणि जिल्हा निहाय विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता यामध्ये फरक असतो

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2025 मध्ये सहभाग घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.www.pmfby.gov.in पीक विमा अर्ज भरण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०२५

टॅग्स :पीक विमापीकशेतकरी