Join us

Crop Insurance Advance : शेतकऱ्यांनो 'या' दिवशी मिळणार विमा अग्रिम वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:43 IST

Crop Insurance Advance : खरीप २०२४ मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. पीक विमा अग्रिम देण्यास बीड जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने मंजुरी दिली आहे.

बीड : खरीप २०२४ मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. पीक विमा अग्रिम (Crop Insurance Advance) देण्यास जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने मंजुरी दिली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तत्काळ अदा करावी, असे भारतीय कृषी विमा कंपनीस निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार, बीड (Beed) जिल्ह्यातील ६ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीक विमा अग्रीम मिळण्याची शक्यता आहे.

मागच्या वर्षी १ जूननंतर चांगला पाऊस (Rain) झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस होताच पेरण्या पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे पीक विमा (Crop Insurance ) भरण्यास लवकरच सुरुवात झाली होती. १ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ या कालावधीत १७ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. जुलैअखेर, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत वेळोवेळी ठिकठिकाणी अतिवृष्टी व सततचा पाऊस झाला.

दरम्यान, जिल्ह्यात २ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे व त्यानंतरच्या सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके पाण्याखाली गेली होती. यासह इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

त्या अनुषंगाने ९ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत व्यापक स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी विमा संरक्षित क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सॅम्पल सर्व्हेचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पीकनिहाय विमा क्षेत्राचा अहवाल समितीस विमा कंपनीच्यावतीने सादर करण्यात आला.

सदरील अहवालावर समितीने चर्चा करून पूर्ण झालेल्या सर्व विमा क्षेत्राच्या सर्वेक्षण अहवालास सर्वानुमते मान्यता दिली. त्यामुळे सर्व मंजूर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तत्काळ अदा करावी, असे भारतीय कृषी विमा कंपनीय निर्देशित करण्यात आले आहे.

६ लाख ५९ हजार शेतकऱ्यांनाच अग्रिम

* बीड जिल्ह्यात सर्व्हे करण्यात आलेल्या ६ लाख ५९ हजार शेतकऱ्यांनाच पीक विमा अग्रिम देण्यात येणार आहे तर वैयक्तिक प्रकारातील २ लाख ४४ हजार शेतकऱ्यांना नुकसानाच्या प्रमाणात विमा रक्कम दिली जाणार आहे.

* सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा संनियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर सदरील याद्या विमा कंपनीकडून मुख्य कार्यालयास पाठविण्यात आल्या आहेत.

* त्यानुसार, शासनाचा हिस्सा प्राप्त झाला असल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मंजूर करून त्यांना प्राप्त होणार आहे.

...अशी आहे पात्र शेतकरी संख्या

तालुकाअग्रीमपात्र शेतकरीनुकसानपात्र शेतकरी
अंबाजोगाई५५७१४१०५७६
आष्टी१९४४३५५०७८
बीड९३७१६४२९७३
धारूर३८७३२५७१९
गेवराई१५३६८४३२९३५
केज६५५९३२५८३६
माजलगाव६५४१५१४०९३
परळी५६६१४१५१८७
पाटोदा२६३४५१८११८
शिरूर५३००२१८५५८
वडवणी३१४६६५३८७
एकूण६५९७२४२४४४६०

हे ही वाचा सविस्तर : QR code : शेतकऱ्यांनो! क्यूआर कोड स्कॅन करा; झटपट मिळवा कागदपत्रे वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रपीक विमापीकखरीपशेतकरीशेतीबीड