Join us

Cotton Seeds : कापूस उत्पादकांच्या खिशाला बसणार महागाईची झळ वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 09:25 IST

Cotton Seeds : अवघ्या काही दिवसांवर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता शेतकरी तयारीला लागले आहेत. यावर्षी खरिप हंगामात कापसाचे बियाणे किती रुपयांनी महागले आहे. ते वाचा सविस्तर (cotton seeds)

रूपेश उत्तरवार

अवघ्या काही दिवसांवर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता शेतकरी तयारीला लागले आहेत. यावर्षी खरिप हंगामात कापसाचे बियाणे ३७ रुपयांनी महागले आहे. गतवर्षी ८६४ रुपयांना असलेली बॅग ९०१ रुपयाला घ्यावी लागणार आहे. (cotton seeds)

शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीचा खर्च वाढणार आहे. बाजारपेठेत दाखल होणारे कपाशीचे बियाणे १ जूननंतरच विकण्याच्या सूचना होत्या. यावर्षी शेतकऱ्यांना १५ मे पासून कापूस बियाणे मिळणार आहे. (cotton seeds)

मात्र, शेतकऱ्यांना १ जूननंतरच कापसाची लागवड करण्याच्या कडक सूचना आहेत. गुलाबी बोंडअळीने कापसाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. (cotton seeds)

गुलाबी बोंडअळीचे कोष नष्ट करण्यासाठी १ जूननंतरच कपाशीची टोचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन व्हावे, म्हणून १ जूननंतरच कापूस बियाणे विक्रीचे आदेश होते. (cotton seeds)

कापसाचे बियाणे कधी विक्री करावे, याच्या सूचना पोहचल्या आहेत. यामुळे बियाणे जरी १५ मे नंतर शेतकऱ्यांना मिळणार असले तरी १ जूननंतरच कापूस लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - संतोष डाबरे, कृषी अधीक्षक, यवतमाळ

हे ही वाचा सविस्तर : Seed Production: 'महाबीज'च्या उत्पादनात 'या' जिल्ह्याची आघाडी; २७,८९५ एकरांवर लागवड! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीशेती