Join us

Cotton Production: देशातील कापसाचे उत्पादन घटले! अशाप्रकारे करणार उपाययोजना वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 15:37 IST

Cotton Production: यंदाच्या वर्षी देशातील कापसाचे उत्पादन ६० लाख गाठीवर घटल्याने कापूस आयात करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने उपाययोजना सुचविल्या आहेत. वाचा सविस्तर

राजरत्न सिरसाट

अकोला : देशातील कापसाचे उत्पादन ६० लाख गाठीवर घटल्याने कापूस आयात करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर उत्पादन वाढीसाठी केंद्र शासनाने 'कापूस तंत्रज्ञान मिशन' सुरू केले असून, राज्यातील अकोला, परभणी व राहुरी कृषी विद्यापीठात यावर संशोधन करण्यात येणार आहे.

याकरिता ५०० कोटी अशी भरीव अनुदानाची तरतूद केली आहे. मागील दहा वर्षात कापसाचे क्षेत्रफळ, उत्पादन घटले आहे. सन २०१९-२० या वर्षात देशात १३४.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली. त्यापासून ३६०.६५ लाख गाठी उत्पादन मिळाले. रुईची उत्पादकता प्रतिहेक्टर ४५५ किलो होती. तेव्हापासून सतत कापूस उत्पादनात घट होत आहे.

सन २०२०-२१ मध्ये ही लागवड घटून १३२.८५ लाख हेक्टर आली. उत्पादन ३५०.४८ लाख गाठी झाले. म्हणजेच, त्यावर्षी १० लाख गाठी उत्पादन घटले. उत्पादकता प्रतिहेक्टर ४४८ (रुई) किलो होती.

सन २०२२-२३ मध्ये आणखी घट झाली. १२३.७२ लाख हेक्टवर लागवड झाली. उत्पादन जवळपास ४० लाख गाठी घटून ३११.१८ लाख गाठी एवढे झाले. उत्पादकता (रुई) प्रतिहेक्टर ४२८ किलो होती.

सन २०२३-२४ मध्ये १२६.८८ लाख हेक्टरवर लागवड तर उत्पादन घटून ३२५.२२ लाख गाठीवर आले. रुईची उत्पादकता प्रतिहेक्टर ४३६ किलो एवढी होती.

५०० कोटी अनुदानाची तरतूद

५०० कोटी अशी भरीव अनुदानाची तरतूद राज्यातील अकोला, परभणी व राहुरी कृषी विद्यापीठात यावर संशोधन करण्यासाठी केली आहे.

मागील वर्षी ६० लाख गाठीवर उत्पादन घटले

संपलेल्या २०२४-२५ च्या खरीप हंगामात देशातील कापसाची लागवड घटून ११३. ६ लाख हेक्टरवर आली. उत्पादकता घटून २९९.२६ लाख गाठीपर्यंत खाली आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कापूस करणार आयात

६० लाख गाठीवर देशातील कापसाचे उत्पादन घटल्याने कापूस आयात करावा लागत आहे.

कापूस उत्पादन वाढिवण्यावर भर

कापूस उत्पादन वाढविण्यासाठी प्रकल्प भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून भारतीय कापूस संशोधन केंद्र नागपूरअंतर्गत कापूस तंत्रज्ञान मिशन राबविण्यात येऊन अधिक उत्पादक वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soyabean, Cotton Update: सोयाबीन, कापसाला मिळत आहेत चांगले दर; वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्ड