Join us

Cotton Cultivation: पूर्वहंगामी कपाशीमुळे बोंडअळीचा धोका वाढतोय वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:39 IST

Cotton Cultivation: कपाशी पिकावर पुन्हा एकदा गुलाबी बोंडअळीचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्वहंगामी कपाशी लागवड केल्यास बोंडअळीचे (bollworm) जीवनचक्र खंडित होत नाही आणि तिचा प्रादुर्भाव वाढतो. वाचा सविस्तर (Cotton Cultivation)

अकोला जिल्ह्यात पूर्वहंगामी कपाशी लागवडीमुळे गुलाबी बोंडअळीचा (bollworm) प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी आयुक्तालयाने यंदा १५ मेपासून बीटी बियाण्यांची विक्री खुली केली असून मागील दोन वर्षांत ही विक्री ३१ मेनंतरच सुरू करण्यात आली होती. (Cotton Cultivation)

कपाशी पिकावर पुन्हा एकदा गुलाबी बोंडअळीचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्वहंगामी कपाशी लागवड केल्यास बोंडअळीचे (bollworm) जीवनचक्र खंडित होत नाही आणि तिचा प्रादुर्भाव वाढतो. (Cotton Cultivation)

हे लक्षात घेता मागील काही वर्षांपासून राज्यात बीटी बियाण्यांच्या विक्रीस ३१ मेपर्यंत बंदी घालण्यात येत होती. मात्र यंदा विक्री १५ मेपासूनच खुली करण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. (Cotton Cultivation)

बीजी-२ वाणातील जनुकांवर बोंडअळीचा प्रभाव फारसा होत नाही, मात्र तरीही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमीअधिक प्रमाणात दिसून येतो. म्हणूनच यावर नियंत्रणासाठी सामूहिक पातळीवर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Cotton Cultivation)

विशेषतः संरक्षित सिंचन असलेल्या भागांमध्ये कपाशीची मान्सूनपूर्व लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे. प्रशासनाने वेळेत विक्री खुली करून धोका वाढवल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, यंदा विभागात १०.६० लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड अपेक्षित आहे. यासाठी ५४.३३ लाख बीटी बियाण्यांच्या पाकिटांची मागणी नोंदवण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ६.३६ लाख, वाशिममध्ये १.५४ लाख आणि बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ९३,९९५ पाकिटांची आवश्यकता आहे.

बोंडअळीचा कपाशीवर कसा होतो परिणाम?

कापसाच्या बोंडअळीच्या अळ्या बोंडांना नुकसान करतात. अळ्या बोंडांच्या तळाला छिद्र पाडतात आणि कवच पोकळ करतात. ओला विष्ठा सहसा बोंडाच्या तळाभोवती जमा होते.

तज्ज्ञ काय सांगतात?

बीजी-२ वाणातील जनुकांना बोंडअळी जुमानत नाही, त्यामुळे कमी अधिक प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा (bollworm) प्रादुर्भाव होतो. सामूहिक उपाययोजनांची गरज आहे. यामध्ये बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी कपाशीची पूर्वहंगामी लागवड  टाळणे महत्त्वाचे आहे.

५४.३३ लाख पाकिटांची मागणी

अकोला विभागात १०.६० लाख हेक्टर कपाशीचे क्षेत्र राहील. यासाठी बीटीच्या ५४,३३,०४५ पाकिटांची मागणी आहे. यामध्ये अकोला ६,३६,५००, वाशिम १,५४,१०० व बुलढाणा जिल्ह्यात ९,३९,९५५ पाकिटे आवश्यक आहेत.

हे ही वाचा सविस्तर: Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने 'ही' पिके झाली जमीनदोस्त वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकापूस