Join us

chilli cultivation : यंदा मिरचीचा 'ठसका' वाढणार २५ टक्के अधिक होणार लागवड ! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:49 IST

chilli cultivation : यंदा विहिरींमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा कल मिरची लागवडीकडे (chilli cultivation) वाढला आहे. वाचा मिरचीचे गणित सविस्तर

chilli cultivation : भोकरदन तालुक्यातील धावडासह वडोद तांगडा, भोरखेडा, सेलूद, वालसावंगी आदी गावांतील शेतकऱ्यांनी रोपवाटिका मालकांकडे आतापर्यंत १० लाख मिरचीच्या रोपांची बुकिंग केली. 

यंदा विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के शेतकऱ्यांनी अधिक मिरचीची लागवड (chilli cultivation) करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वडोद तांगडा येथील शेतकरी गणेश तांगडे यांनी सांगितले आहे. (chilli cultivation)

भोकरदन तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून उन्हाळी मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड (chilli cultivation) करतात. यंदा विहिरींमध्ये मुलबक पाणीसाठा असल्यामुळे शेतकऱ्यांनी १० एप्रिलपासून मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

भोकरदन तालुक्यातील शेतकरी एक-दोन एकरात मिरचीची लागवड (chilli cultivation) करण्यासाठी मल्चिंग पेपर, विविध प्रकारची रासायनिक खते, शेणखत, ठिबक संचाची खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी मार्च, तर काहींनी एप्रिलमध्ये मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे पाणी साठवण क्षमता कमी आहे, ते १ मेनंतर मिरचीची लागवड (chilli cultivation) करणार असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु आपल्या शेतात लावलेली उन्हाळी मिरची जगली पाहिजे, या उद्देशाने अनेकांनी ठिबकवर लागवड करण्याचा निर्णय घेतला असून, ठिबकच्या खरेदीवर भर दिला आहे.

जमिनीमध्ये ओलावा

यंदा चांगला भाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरची लागवडीवर भर दिला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिरचीची रोपे लावताना कमी प्रमाणात पाणी लागणार आहे.

पाणीसाठा उपलब्ध

यंदा विहिरींमध्ये ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका एकरात मिरची लागवडीचा खर्च

मल्चिंग१४ हजार
ठिबक१५ हजार
भेसळ खताचे डोस८ हजार
मजुरी१० हजार
मिरचीची रोपे१५ हजार

मागील वर्षी हिरवी व लाल मिरचीला चांगला भाव मिळाला आहे. त्यामुळे यंदा नगदी पीक म्हणून १० एप्रिल रोजी तीन एकरामध्ये मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. मिरचीचा पैसे येत असल्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर खासगी सावकाराकडे जावे लागणार नाही. - बाबूराव काळे, मिरची उत्पादक शेतकरी, भोरखेडा

यंदा चांगला भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे कल वाढला. आतापर्यंत शेतकऱ्यांनी १० लाख मिरचीची रोपे बुकिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. आता मिरचीची १ काड़ी १ रुपया ६० पैशाला मिळत आहे. ऐनवेळी २ रु. मोजावे लागतात. - गणेश तांगडे, शेतकरी, वडोद तांगडा.

हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Cultivation: यंदा बुलढाण्यात वाढणार उसाचा गोडवा; 'या' कारणामुळे वाढले क्षेत्र वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमिरचीशेतकरीशेती