Join us

चिक्कूच्या घोलवडची ओळख आता मधाचे गाव घोलवड अशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 11:25 AM

मधाचे गाव हा उपक्रम शेती आणि पर्यावरणपूरक असून घोलवड हे राज्यातील तिसरे मधाचे गाव झाल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी डहाणू येथे जाहीर केले.

मधाचे गाव हा उपक्रम शेती आणि पर्यावरणपूरक असून घोलवड हे राज्यातील तिसरे मधाचे गाव झाल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी डहाणू येथे जाहीर केले.

या मंडळाने घोलवड ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने 'मधाचे गाव घोलवड' या कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा शनिवार, ९ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात आयोजित केला होता.

पंतप्रधानांच्या मथक्रांती आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत घोलवड येथे मधाचे गाव घोषित झाले. प्रत्येक जिल्ह्यातील एका गावाची निवड तसेच गाव तेथे मधपेटीची गरज मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितली. या व्यवसायातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारेल तर मधमाशी वाचवण्याच्या चळवळीची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पर्यटन व राजीव गांधी पुरस्कारप्राप्त मधाच्या दोन्ही गावांप्रमाणेच लवकरच घोलवडचा सामवेश होईल, अशा शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून रोजगार निर्मिती व पर्यावरण संवर्धन होणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन देत, मधपेट्या वापराचे तंत्रज्ञान समजून घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.

राज्यात मधाचे गाव ही संकल्पना २०२२ साली राबवली. चिकूच्या गावाची ही नवी ओळख असल्याचे या मंडळाच्या महाबळेश्वर मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील यांनी प्रस्तावनेतून सांगितली. मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, जिल्हा मंडळ अधिकारी अंजना गायकवाड, खासदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष भरत राजपूत, तहसीलदार अभिजित देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव, पंचायत समिती सदस्य लक्ष्मी खुराडा, चिखले सरपंच अभिजित काटेला, उपसरपंच मनोज राऊत, रामपूरचे सरपंच रवींद्र पडवळे उपसरपंच किरण मोहिते तसेच मान्यवरांचे स्वागत घोलवड सरपंच रवींद्र बुजड यांनी केले. या कार्यक्रमात गावच्या प्रशिक्षित महिला मधपालकांना सातेरी मधपेट्या व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

मधुबन निर्मितीघोलवड गावच्या तलाव परिसरात मधुबनाची निर्मिती करण्यात आली. तेथे मधमाश्यांच्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी मधनिर्मितीची माहिती व मधसंकलन, प्रक्रिया केंद्र उभारले जाणार असल्याचे सांगितले.

घोलवड गावचा जाज्वल्य इतिहास लेखक दिगंबर राऊत यांनी सांगितला. उपक्रमाची वाटचाल घोलवडचे उपसरपंच कुणाल शहा यांनी समारोपातून मांडली. वंदे मातरम् ही धून जयवंत गंधकवाड यांनी बासरीच्या सुरावटीतून कार्यक्रमाची सांगता केली.

टॅग्स :पालघरखादीराज्य सरकारमहाराष्ट्रशेतकरीशेती