शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत गव्हाबरोबरच ज्वारीचे वितरण करण्यात आले होते. यात गहू, ज्वारी आणि तांदळाचा पुरवठा केला आहे.
नववर्षात रेशनवर ज्वारी बंद होणार असून, धान्य वाटपात पुन्हा एकदा बदल केला आहे. त्यामुळे आता गहू ३ किलो आणि तांदूळ २ किलो मिळणार आहे.
मागील दोन महिने अंत्योदय योजनेंतर्गत प्रत्येकी पाच किलो गहू व पाच किलो ज्वारी, तसेच २५ किलो तांदूळ देण्यात आला.
तर प्राधान्य कुटुंबांना यापूर्वी मिळणाऱ्या दोन किलो गहू व तीन किलो तांदळाऐवजी एक किलो गहू व एक किलो ज्वारीचे वितरण केले होते. म्हणजेच, पूर्वीच्या गहूऐवजी गहू व ज्वारीचे संयुक्त वाटप केले होते.
नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना ज्वारी मिळत होती. जानेवारीपासून धान्य वाटपात पुन्हा बदल केले जाणार आहे. दरम्यान, राज्यातील रेशनधारकांसाठी नववर्षात महत्त्वाचा बदल होणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनांमधील नवीन धान्यप्रमाण पुन्हा लागू करण्यात येणार आहे.
जानेवारी २०२६ पासून अंत्योदय योजनेत २१ किलो गहू व १४ किलो तांदूळ, असे एकूण ३५ किलो धान्य मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेत प्रत्येकी दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू दिला जाणार आहे.
अधिक वाचा: नवीन वर्षात बासमती तांदळाच्या मागणीत मोठी वाढ; वाचा कोणत्या तांदळाला मिळतोय किती दर?