Join us

मराठवाड्यात पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी कसे करावे पीक व्यवस्थापन?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 4:24 PM

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विद्यापीठाचा कृषीसल्ला

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 30 मार्च रोजी लातूर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात वाढ होऊन रात्रीच्या वेळी उष्णता जाणवेल व त्यानंतर कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात पुढील तीन दिवसात कमाल तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

  • काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. 
  • काढणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  

गव्हाची काढणी 

  • काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करावी. 
  • काढणी केलेल्या गहू पिकाची मळणी करून घ्यावी. 
  • मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  

करडई पिकाची काढणी आणि मळणी

  • वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या करडई पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. 
  • मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  

हळदीची काढणी करा मिळतोय भाव चांगला

  • हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. 
  • कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.  

उन्हाळी भुईमूगाचे पाणीव्यवस्थापन

  • कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील चार दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे. 
  • भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
टॅग्स :शेतीहवामानपाऊसतापमान