कोल्हापूर : केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर केला असून २२ लाख टन साखर कारखान्यांना विक्री करता येणार आहे.
मागील वर्षीएवढाच हा कोटा असल्याने घाऊक बाजारात साखरेच्या दरात फारशी चढ-उतार होईल, असे सध्या तरी वाटत नाही.
सरकारने नोव्हेंबर महिन्यासाठी देशांतर्गत साखर विक्रीसाठी २० लाख टन कोटा दिला होता. त्यातील बहुतांशी साखरेची विक्री झाली आहे. डिसेंबरच्या कोट्यात गेल्यावर्षीपेक्षा वाढ केलेली नाही.
संक्रांतीच्या तोंडावर साखरेची मागणी वाढणार असली तरी यंदा गेल्यावर्षीपेक्षा साखरेचे उत्पादन थोडे अधिक होणार असल्याने दरावर फारसा परिणाम होणार नाही.
सध्या राज्यातील बहुतांश साखर कारखान्याचा गाळप हंगाम वेगाने सुरू आहे. त्यामुळे नवीन साखरदेखील जास्त प्रमाणात येत आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने साखर विक्रीचा कोटा जरी वाढवला तरी त्याचा दरावर फारसा परिणाम होणार नाही असे साखर तज्ञांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी देखील डिसेंबर महिन्यासाठी २२ लाख टन एवढाच विक्रीसाठी साठा जाहीर केला होता.
मागील हंगामातील साखर विक्रीचा कोटा असा..◼️ हंगाम २०२३-२४ (ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४)२९१.५० लाख टन साखर कोटा.◼️ हंगाम २०२४-२५ (ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५)२७५.५० लाख टन साखर कोटा.
चालू गळीत हंगामात साखरेचा पुरवठा जादा होईल, मागणी जरी वाढणार असली तरी दरावर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे साखर कारखान्यांनी साखर विक्री करताना बाजारपेठेचा अंदाज घेऊन करावी. - पी. जी. मेढे, अभ्यासक, साखर उद्योग
अधिक वाचा: साखर आयुक्तांचा नवा आदेश; उसतोडीसाठी टाळाटाळ केली तर शेतकऱ्यांना 'इथे' करता येणार तक्रार
Web Summary : The central government declared a 2.2 million ton sugar quota for December. Experts predict stable sugar prices due to sufficient production despite increased demand during Sankranti. Current sugar production is high, minimizing the quota's impact on market rates, similar to last year's quota.
Web Summary : केंद्र सरकार ने दिसंबर के लिए 2.2 मिलियन टन चीनी कोटा घोषित किया। विशेषज्ञों का अनुमान है कि संक्रांति के दौरान मांग बढ़ने के बावजूद पर्याप्त उत्पादन के कारण चीनी की कीमतें स्थिर रहेंगी। वर्तमान चीनी उत्पादन अधिक है, जिससे बाजार दरों पर कोटा का प्रभाव कम होगा, जो पिछले साल के कोटा के समान है।