Pune : ब्रोकोली ही भाजीपाला पिकांमधील महत्त्वाची परदेशी भाजी असून केंद्र सरकार ब्रोकोलीच्या लागवड, प्रसार, पायाभूत सुविधा विकास आणि कोल्ड स्टोरेज सुविधांसाठी समर्पित उत्कृष्टता केंद्र (Center of Excellence) स्थापन करणार आहे. पोषक तत्त्वांनी नैसर्गिक सुपरफुड असलेल्या ब्रोकोलीला लोकप्रिय करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती केंद्रीय कृषी विभागाचे कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंह यांनी दिली.
ब्रोकोली मूल्य साखळीतील सर्व भागधारकांना एकत्र आणण्यासाठी मुंबईतील हॉटेल जेडब्ल्यू मॅरियट, जुहू येथे साकाता सीड इंडिया आयोजित 'ब्रोकोली कंजम्शन भारत परिषद २०२६' १७ जानेवारी रोजी पार पडली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी केले, यामध्ये डॉ. पी.के. सिंग, मुंबईतील जपानचे कॉन्सुलेट जनरल यागी कोजी, केंद्रीय कृषी उपआयुक्त डॉ. मेहराज ए.एस., साकाटा सीड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक केन्जी ताकिकावा,कार्यकारी अधिकारी इसाओ इउची आणि जेव्हियर बार्नाबू (स्पेनमधील ब्रोकोली क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे) यांचा समावेश होता.
"सर्वांसाठी आरोग्य आणि आनंद" या थीमवर ही परिषद शेतकरी, लागवड करणारे, कापणी करणारे, विपणक, ग्राहक आणि स्वयंपाक तज्ज्ञांना एकत्र आणून शाश्वत ब्रोकोली पर्यावरण निर्माण करण्यासाठी होती. त्यांनी स्वस्थ भारत अभियानांतर्गत जागृती मोहीम सुरू करण्यावर भर दिला, ज्यात "आरोग्यसंपन्न आणि स्वावलंबी भारताला सक्षम करणे" आणि "आरोग्य आणि आनंदाचा खजिना – दररोज ब्रोकोली खा" अशा घोषवाक्यांचा समावेश आहे." असे मत साकाता सीड इंडियाचे संचालक रमेश शिर्गुप्पी यांनी व्यक्त केले. यासोबतच भारतातील प्रति व्यक्ती ब्रोकोलीचे सेवन दिवसेंदिवस वाढत असल्याचे आणि त्याच्या पौष्टिक फायद्यांची जागृती वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. पी.के. सिंग यांनी सांगितले की, "ही भारतातील भाजीपाला क्षेत्रातील पहिलीच ब्रोकोली-केंद्रित परिषद आहे, ज्यात अन्न सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि क्लस्टर विकासाद्वारे शेतकरी सक्षमीकरणाची मोठी क्षमता आहे. यासाठी लागवड, कोल्ड स्टोरेज आणि प्रक्रियेसाठी सरकारचे संपूर्ण समर्थन असेल, ज्यात उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) स्थापन करून तांत्रिक शिक्षण, दर्जेदार उत्पादन मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी मार्केट लिंकेज देण्यात येईल. या उपक्रमासाठी जपान सरकारची मदत घेतली जाऊ शकते."
साकाटा सीड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक केन्जी ताकिकावा यांनी २००८ पासून भारतातील कंपनीच्या १७ वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला आणि लागवड ते प्रक्रिया आणि ग्रहण यापर्यंत ब्रोकोली साखळीतील सर्व भागधारकांना जोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, "जपान सरकार २०२६ आर्थिक वर्षापासून ब्रोकोलीला 'नियुक्त भाजीपाला' यादीत समाविष्ट करून त्याचे प्रचार करत आहे."
मुंबईतील जपानचे कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी सांगितले की, ब्रोकोली जपानची मूळ नाही, तरीही सरकार आणि सामूहिक प्रयत्नांमुळे ती जगभरातील १७० देशांमध्ये पसरली आहे. जपानने भारतासाठी हवामानानुसार अनुकूल बियाणे विकसित केले असून, ब्रोकोलीला देशाच्या पोषण आणि एकूण विकासासाठी महत्त्वपूर्ण घटक बनवले आहे.परिषदेत क्रिकेटर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी प्रेरणादायी भाषण केले. "आरोग्य म्हणजे संपत्ती" हा मंत्र देत मी आठवड्यातून चार वेळा ब्रोकोलीचे सूप घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
इतर ठळक मुद्दे
- शिनाया किमुरा यांचे जागतिक ब्रोकोली प्रचार आणि संधींवर सादरीकरण.
- डॉ. नझनीन हुसैन, डॉ. राजश्री ताईशेटे, डॉ. शालिनी आर्या इत्यादी तज्ज्ञांच्या पॅनेल चर्चा.
- स्पेनमधील यशस्वी ब्रोकोली प्रचाराबाबत श्री जेव्हियर बार्नाबू यांचे अंतर्दृष्टी.
- आरोग्य प्रशिक्षक मिस क्लाउडिया सिसला यांचे कुपोषण आणि दीर्घकालीन आजारांविरुद्ध ब्रोकोलीची भूमिका.
- प्री-कूलिंग, थंड वाहतूक आणि सानुकूलित थंड साठवण यावर चर्चा.
- सेलिब्रिटी शेफ श्री संजीव कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली गृहिणींसाठी ब्रोकोली रेसिपी स्पर्धा.
- साकाटा सीड कॉर्पोरेशन आणि साकाटा सीड इंडियाने सर्व पाहुणे, प्रतिनिधी आणि सहभागींना धन्यवाद दिले आणि ही घटना भाजीपाला उद्योगातील ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगितले.
Web Summary : India will establish a Center of Excellence for broccoli cultivation, infrastructure, and cold storage. The initiative aims to popularize this nutritious superfood. A Sakata Seed India conference in Mumbai highlighted broccoli's potential for food security and farmer empowerment, with government support promised for cultivation and processing.
Web Summary : भारत ब्रोकोली की खेती, बुनियादी ढांचे और कोल्ड स्टोरेज के लिए 'सेंटर ऑफ एक्सीलेंस' स्थापित करेगा। इस पहल का उद्देश्य पौष्टिक सुपरफूड को लोकप्रिय बनाना है। मुंबई में साकाटा सीड इंडिया सम्मेलन में खाद्य सुरक्षा और किसान सशक्तिकरण के लिए ब्रोकोली की क्षमता पर प्रकाश डाला गया, जिसमें खेती और प्रसंस्करण के लिए सरकारी समर्थन का वादा किया गया।