Join us

Beekeeping Scheme : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मधमाशीपालनासाठी अनुदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 23:42 IST

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मधमाशी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध कामांसाठी अनुदान देण्यात येत आहे.

Pune : मधमाशीपालनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून मधमाशीपालनासाठी विविध योजना राबवण्यात येतात. ज्यामध्ये विविध घटकांसाठी अनुदान मिळते. राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध अभियानांतर्गत तीन वेगवेगळ्या लघु अभियानांतर्गत अनुदान देण्यात येते. त्यामध्ये मधमाशी वसाहती घेणे, मध संकलन, प्रक्रिया उद्योग आणि विक्री व्यवस्थेसाठी अनुदान देण्यात येत असून शेतकऱ्यांना मधमाशीपालनाकडे वळवले जात आहे.

दरम्यान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत परपरागीकरणासाठी मधुमक्षिकापालन ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत वसाहतीसह मधमाशी पेटी विकत घेणे, मधमाशीपालनासाठी लागणारा विविध वस्तूंचा संच, मध काढणी यंत्र यासाठी अनुदान देण्यात येते.

अनुदानाचे विविरण

घटक - प्रकल्प खर्च - अनुदान

  • मधुमक्षिका पेटी वसाहतीसह (कमाल ५० संच) - रु.४,००० - रु. १,६००
  • मधुमक्षिका पेटी (BEE HIVE, कमाल ५० संच) - रु.२,००० - रु. ८००
  • मध काढणी यंत्र व मध साठवणेकरीता भांडे - रु.२०,००० - रु. ८,०००

 

यापैकी अनुक्रमांक ३ ते ५ मधील घटकाकरिता अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत देण्यात येते. या घटकांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. उर्वरित घटकासाठी राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान अंतर्गत प्रस्ताव सादर करावेत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क

> संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय> महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणेसंपर्क क्रमांक - (०२०) - २९७०३२२८

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी