Join us

Bank Loan : शेतकऱ्यांना कर्ज देण्यास का आहेत बँका उदासीन; काय आहे कारण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 17:23 IST

Bank Loan : यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी (farmers) कर्जाची परतफेडच केली नाही. परिणामी थकीत कर्जाचा डोंगर वाढला. यातून बँकाही अडचणीत आल्याने त्यांनी यंदा कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. वाचा सविस्तर (Bank Loan)

Bank Loan : यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी (farmers) कर्जाची परतफेडच केली नाही. परिणामी थकीत कर्जाचा डोंगर वाढला. यातून बँकाही अडचणीत आल्याने त्यांनी यंदा कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. (Bank Loan)

२२०० कोटीचे उद्दिष्ट आतापर्यंत केवळ पाच हजार शेतकऱ्यांना (farmers) ७० कोटींचे कृषी कर्ज वाटप झाल्याने येणाऱ्या दिवसात कर्जवाटपाची गती वाढवावी लागणार आहे. (Bank Loan)

यावर्षीच्या खरीप हंगामात १९ बँकांना २२०० कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मोठे असले तरी पात्र शेतकऱ्यांची (farmers) संख्या कमी आहे. यामुळे कर्ज वाटणार कसे आणि उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्न बँकेसमोर उभा ठाकला आहे. (Bank Loan)

सर्वाधिक कर्ज वितरण विदर्भ कोकण बँकेचे

जिल्ह्यात सर्वाधिक कर्जाचे वितरण विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने केले आहे. या बँकेला १९५ कोटी रुपयाच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. यापैकी बँकेने ३३ कोटी ३३ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या १७ टक्के कर्ज वितरण बँकेने केले आहे.

इंडूसन बँक, डीसीबी बँकेचा श्रीगणेशाच नाही

जिल्ह्यातील १९ बँकेने आतापर्यंत तीन टक्के कर्ज वितरण केले आहे. यात इंडूसन बँक आणि डीसीबी बँकेने अद्याप कर्जच वाटले नाही तर जिल्हा बँकेने ०.४६ टक्के कर्जाचे वितरण केले आहे, तर सर्वात मोठी राष्ट्रीयीकृत बँक म्हणून ओळखली जाणारी स्टेट बँक १.६७ टक्के कर्जाचेच वितरण करू शकली आहे. ते उद्दिष्ट कधी पूर्ण करतील याकडे लक्ष लागले आहे.

मशागतीसाठी पैशाची तजवीज

* शेतीचा हंगाम सुरू करण्यासाठी मशागत करावी लागते. आता पारंपरिक बैलांचा वापर पूर्णतः बंद झाला आहे. ट्रॅक्टरशिवाय कुठेही मशागत होत नाही. ही यांत्रिक मशागत शेतकऱ्यांना नगदी पैसे मोजूनच करावी लागते. 

* डिझेलचे दर वाढले असल्याने मशागतीचा खर्च सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत पीक कर्ज हाती न आल्यामुळे खासगी सावकारांकडून मशागतीसाठी कर्ज उचलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

बँकांनी कर्ज वितरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. थकबाकीने कर्ज वितरणाची प्रक्रिया प्रभावित झाली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज परतफेडीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. यामुळे कर्ज भरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळेल. - ज्ञानेश्वर टापरे, अग्रनी बँक, व्यवस्थापक

हे ही वाचा सविस्तर : Tembhurne Healthy Fruit: तुम्हाला 'टेंभुर्णे' फळ माहित आहे का? वाचा त्याचे आरोग्यदायी फायदे

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबँकपीकपीक कर्जयवतमाळ