Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. भगवानराव कापसे यांची कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या निवड समितीवर नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 15:28 IST

फळबाग तज्ज्ञ व गट शेतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे डॉ. भगवानराव कापसे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या राज्यातील चारही विद्यापीठांच्या प्राध्यापक ते संचालक पदापर्यंतच्या निवडीसाठीच्या समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून डॉ. कापसे तीन वर्षे या निवड समितीत राहतील.

महाराष्ट्रातील चारही विद्यापीठात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. या परिषदेद्वारे चारही विद्यापीठांतील पदभरती व इतर समस्या सोडविल्या जातात. यात विद्यापीठांतील प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, अधिष्ठाता, संचालक आदी पदांवरील नियुक्तीसाठी एक समिती असते.

या निवड समितीमध्ये समितीमध्ये डॉ. कापसे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काम पाहतील. पुढील तीन वर्षांपर्यंत त्यांना या पदावर काम करता येईल. आशा आहे डॉ. कापसे यांच्या माध्यमातून कृषी विद्यापीठांतील पदभरती व इतर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

टॅग्स :सरकारराज्य सरकारशेतीविद्यापीठफळेफलोत्पादन