AI Smart Farming : आजच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रत्येक क्षेत्रात वापर वाढत आहे. शेतीही त्याला अपवाद नाही. अशी माहिती या विषयातील तज्ज्ञ डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी सांगितले. (AI Smart Farming)
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रगत व बुद्धिमान यंत्रे बनविण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर होत असून, माणसाप्रमाणे कार्यान्वित होणारी बुद्धिमता संगणकीय प्रणालीद्वारे तयार करून अपेक्षित कार्य साध्य केले जाते. (AI Smart Farming)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स विविध उद्योगांमध्ये क्रांती घडवत आहे. शेतीही त्याला अपवाद नाही. सतत बदलणाऱ्या हवामानाच्या प्रभावामुळे शेतीत अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे एआय आधारित तंत्रज्ञान उपयोगी व लाभदायी ठरणारे आहे. (AI Smart Farming)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे नेमकं काय ?
एआय म्हणजे संगणकीय प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल. यातून निर्णयक्षम, कार्यक्षम व स्वयंचलित प्रणाली तयार केल्या जातात.
कृषिक्षेत्रात एआयचा उपयोग कशासाठी होतो?
हवामान अंदाज, कीडरोग नियंत्रण, मातीचे आरोग्य निरीक्षण, खताचे व्यवस्थापन, काढणीची योग्य वेळ, उत्पादनाचे वर्गीकरण व साठवणूक.सर्व बाबतीत एआय मोठी मदत करते.
एआय आधारित उपकरणांचा शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होतो?
ड्रोन, स्मार्ट सेन्सर, स्वयंचलित फवारणी यंत्रे आदींद्वारे खर्च, वेळ आणि श्रम वाचतात. उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढते.
विदर्भात एआयबाबत कोणते प्रकल्प सुरू आहेत?
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे १२० एकर क्षेत्रांत ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचा प्रयोग सुरू आहे. तसेच स्मार्ट खत व्यवस्थापन, साठवणूक प्रणाली व एआय-आधारित (AI) काढणीचे यंत्र विकसित केले जात आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि शेतीत तिचा वापर कसा होतो?
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) (AI) म्हणजे संगणक प्रणालीच्या मदतीने मानवी बुद्धीची नक्कल. शेतीमध्ये ती हवामान अंदाज, मातीचे परीक्षण, कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि पीक उत्पादनात मदत करते.
एआयमुळे शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सुटू शकतात?
मजूर टंचाई, उत्पादन खर्च, कीडरोग नियंत्रण, योग्य साठवणूक व मार्केटिंग यांसारख्या अडचणी एआयद्वारे सुलभ होतात. एआय सक्षम ड्रोन, रोबोट्स व सेन्सर्स वापरून कामे जलद व अचूक होतात.
विदर्भात एआय आधारित कोणते प्रयोग सुरू आहेत?
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी, माती आरोग्य परीक्षण, स्मार्ट खत व्यवस्थापनासाठी व्हीआरएफए उपकरणे, संरक्षित शेतीसाठी ग्रीनहाउस ऑटोमेशन अशा अनेक प्रयोगात्मक उपक्रम सुरू आहेत.
एआयमुळे शेतीचा भविष्यकाळ कसा असेल?
एआयमुळे उत्पादन, नफा आणि शाश्वतता वाढेल. छोट्या शेतकऱ्यांनाही आधुनिक शेती करता येईल. हवामान बदल, जलसंवर्धन व अन्नसुरक्षा यावरही प्रभाव पडेल.