Join us

कृषी संशोधन विद्यार्थ्यांचा आक्रोश; रस्त्यावर विद्यार्थिनींचा मुक्काम! मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:34 IST

संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी, अमृत या संस्थांकडून फेलोशिप देण्यात येते. पण मागील दोन वर्षांपासून या संस्थांकडून मिळणारी फेलोशिप बंद करण्यात आली आहे.

Pune : मागील पाच दिवसांपासून कृषी आणि इतर विषयातील संशोधन विद्यार्थ्यांचे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी म्हणून राज्यभरातील विद्यार्थी अन् विद्यार्थिनी कोणतीही सुविधा नसताना अक्षरशः रस्त्यावर झोपून आंदोलन करत असून या आंदोलनाकडे कोणत्याच राजकीय नेत्याचे लक्ष नाही. त्यामुळे सरकारला शिक्षण अन् संशोधनाबद्दल काहीच गांभीर्य नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी, अमृत या संस्थांकडून फेलोशिप देण्यात येते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी हातभार लागतो, पण मागील दोन वर्षांपासून या संस्थांकडून मिळणारी फेलोशिप बंद करण्यात आली असून ही फेलोशिप सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात येते आहे.

या आंदोलनातमध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून पीएचडी करणारे विद्यार्थी अन् विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. यामध्ये विवाहित मुले आणि महिलांचाही सामावेश असून पोटाला चिमटा काढून संशोधन करावे लागत असल्याच्या भावना त्यांनी लोकमत अॅग्रोशी बोलताना व्यक्त केल्या. आंदोलनकर्त्या विद्यार्थीनींनाही रस्त्यावरच मुक्काम करावा लागत असून या आंदोलनाकडे कुणीच लक्ष देत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष वाढताना दिसत आहे. 

काय आहेत मागण्या?- २०२३-२४ व २०२४-२५ या बॅचच्या पीएचडी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करून सरसकट फेलोशिप लागू करावी- संपूर्ण निवड प्रक्रिया तात्काळ लागू करावी- थकीत व प्रलंबित फेलोशिप वितरित करावी

कुणाचेच नाही लक्षएकीकडे कृषी शिक्षणक्रम सध्याच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत जवळपास कालबाह्य झाला असताना, कृषी संशोधनासाठी कोणत्याच योजना किंवा प्रोत्साहन सरकारकडून दिले जात नसताना संशोधक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडताना दिसत आहे. शिक्षणासंदर्भात सरकारची असलेला अनास्था पाहून सरकारला शिक्षण आणि संशोधनाबद्दल काहीच गांभीर्य नाही हे अधोरेखित करते.

टॅग्स :शेती क्षेत्रपुणे