lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > एडीटी, बारामती व स्मार्ट, पुणे यांच्यामध्ये ‘मूल्यसाखळी विकास’ क्षमता बांधणी कार्यक्रम राबविणेबाबत करार

एडीटी, बारामती व स्मार्ट, पुणे यांच्यामध्ये ‘मूल्यसाखळी विकास’ क्षमता बांधणी कार्यक्रम राबविणेबाबत करार

Agreement between ADT, Baramati and SMART, Pune to implement 'Value Chain Development' capacity building programme | एडीटी, बारामती व स्मार्ट, पुणे यांच्यामध्ये ‘मूल्यसाखळी विकास’ क्षमता बांधणी कार्यक्रम राबविणेबाबत करार

एडीटी, बारामती व स्मार्ट, पुणे यांच्यामध्ये ‘मूल्यसाखळी विकास’ क्षमता बांधणी कार्यक्रम राबविणेबाबत करार

या प्रशिक्षण कार्यक्रमातून यापुढे स्मार्टचे २० तज्ञ प्रशिक्षक तयार होणार आहेत यांना अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि नेदरलँड्स येथे ३ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमातून यापुढे स्मार्टचे २० तज्ञ प्रशिक्षक तयार होणार आहेत यांना अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि नेदरलँड्स येथे ३ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र राज्यात मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) हा जागतिक बँक अर्थसहाय्यीत प्रकल्प मुख्यत: कृषी विभाग आणि अन्य संलग्न विभागांमार्फत राबविण्यात येत आहे. या प्रकल्याचा कालावधी २०२० ते २०२७. या प्रकल्प व करारांतर्गत समुदाय आधारित संस्थेच्या व शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्रस्थानी ठेवून फळे व भाजीपाला मूल्यसाखळी विकास याकरिता स्मार्ट प्रकल्प २० अधिकारी आणि समुदाय आधारित संस्था व शेतकरी उत्पादक संस्थामधील ८०० अधिकारी यांचा क्षमता बांधणी कार्यक्रम राबविण्याचा करार दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती येथे पार पड‌ला. या प्रसंगी ज्ञानेश्वर बोटे-अतिरिक्त प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी झाल्या.

या प्रकल्पासाठी कृषी सचिव अनुपकुमार व कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टकडे उपलब्ध असणारे कुशल मनुष्यबळ, सोयीसुविधा, नेदरलँड्स या देशासमवेत असणारे सामंजस्य करार व उपलब्ध तज्ञांच्या सुविधांमुळे सदरील केंद्राचा प्रस्ताव स्मार्ट कार्यालय, पुणे व वर्ल्ड बँकेने मान्य केला. या करारामधून निश्चितच उत्तम पिक उत्पादन पद्धती, फळे व भाजीपाला पिकांचे काढणीपश्चात व्यवस्थापन  व याच पिकांची मूल्यवर्धित साखळी निर्माण होईल असे मत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमातून यापुढे स्मार्टचे २० तज्ञ प्रशिक्षक तयार होणार आहेत यांना अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि नेदरलँड्स येथे ३ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नंतर हे तज्ञ प्रशिक्षक ‘स्मार्ट’ प्रकल्पातील समुदाय आधारित संस्थांमधील ८०० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणात फळे व भाजीपाला मूल्यवर्धित साखळी विकास संदर्भाने कौशल्यआधारित प्रशिक्षण कार्यक्रम व्हॅन हॉल लॉरेंनस्टाईन विद्यापीठ, नेदरलँड्स, भाजीपाला गुणवत्ता केंद्र (इंडो-डच प्रकल्प), कृषि विज्ञान केंद्र, बारामती, हॉलंडडोअर कंपनी नेदरलँड्स व अटल इनक्युबेशन सेंटर, बारामती यामधील तज्ञांनी विशेष कृती आराखडा तयार केल्याची माहिती यशवंत जगदाळे, प्रकल्प समन्वयक यांनी दिली.

या प्रसंगी ज्ञानेश्वर बोटे, अतिरिक्त प्रकल संचालक, स्मार्ट, पुणे, राजेंद्र पवार, चेअरमन, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, प्रा. निलेश नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अटल इनक्युबेशन सेंटरच्या मुख्य अधिकारी जया तिवारी व यशवंत जगदाळे, प्रकल्प कार्यक्रम समन्वयक हे उपस्थित होते.

Web Title: Agreement between ADT, Baramati and SMART, Pune to implement 'Value Chain Development' capacity building programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.