Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > अजूनही घेता येईल कापूस, सोयाबीन; पावसानंतर राज्यात पेरण्यांना वेग

अजूनही घेता येईल कापूस, सोयाबीन; पावसानंतर राज्यात पेरण्यांना वेग

after monsoon spread over Maharashtra kharif sowing speed up | अजूनही घेता येईल कापूस, सोयाबीन; पावसानंतर राज्यात पेरण्यांना वेग

अजूनही घेता येईल कापूस, सोयाबीन; पावसानंतर राज्यात पेरण्यांना वेग

राज्यात तीन दिवसांत अडीच लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान उडीद, मूग आंतरपीक घ्या, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

राज्यात तीन दिवसांत अडीच लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान उडीद, मूग आंतरपीक घ्या, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात ३६ मिमी पाऊस झाला. यामुळे बळीराजा सुखावला असून, खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. अडीच लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या. यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

सर्वाधिक पेरणी नाशिक विभागात, तर सर्वात कमी पेरणी नागपूर विभागात झाली आहे. उडीद व मूग पीक लागवडीचा हंगाम जवळजवळ संपत आला असून, ही पिके सलग न घेता आंतरपीक म्हणून घ्यावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

राज्यभरात शनिवारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. खरिपाच्या पेरण्यांची लगबगही सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात विदर्भ व कोकणात चांगला पाऊस सुरू झाला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुलनेने पाऊस कमी झाला आहे. तरीही राज्यभरात सर्वदूर पेरण्यांना वेग आला आहे.

राज्यात रविवारअखेर २ लाख ४७ हजार ९६६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. राज्याची सरासरी क्षेत्र १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर इतके असून, एकूण पेरणी झालेले क्षेत्र १.७५ हेक्टर इतके आहे. टक्के आहे. नाशिक विभागातील जळगाव व धुळे जिल्ह्यांत कापसाची धूळ पेरणी झाल्याने या विभागात सर्वाधिक १ लाख २३ हजार ३८३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वांत कमी पेरणी क्षेत्र नागपूर विभागात २२३ हेक्टर इतकी आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात दमदार पावसाची शक्यता असल्याने पेरण्यांच्या टक्केवारीत मोठी वाढ होईल, अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले, 'राज्याची जूनची पावसाची सरासरी २०७ मिमी इतकी असून, आतापर्यंत केवळ ५३ • मिमी पाऊस झाला आहे. हे प्रमाण २५ टक्केच आहे. विदर्भ व कोकणात चांगला पाऊस झाला आहे. विदर्भातील शेती कोरडवाहू असल्याने तेथे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. कोकणातही पुरेसा पाऊस झाल्याने तेथे भात लागवड सुरू होईल. नाशिक व मराठवाड्यात कमी पाऊस झाला असून चांगल्या पावसाची

बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध
कृषी आयुक्त चव्हाण म्हणाले, 'उडीद व मूग या पिकांच्या लागवडीचा कालावधी जवळजवळ संपत आल्याने शेतकयांनी आता सलग पीक घेण्याऐवजी मुख्य पिकात आंतरपीक घ्यावे. त्यामुळे उत्पादनात थोडी घट झाली तरी ही दोन्ही पिके घेता येतील. कापूस व सोयाबीनच्या लागवडीसाठी अजूनही वेळ गेलेली नाही. पेरण्यांना सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली आहे. तरीही बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच खतांचाही पुरवठा सुरळीत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Web Title: after monsoon spread over Maharashtra kharif sowing speed up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.