Join us

निळवंडेतून १० हजार क्सूसेक, गंगापूर, कडवा, मुकणे धरणातून किती झाला विसर्ग?

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 26, 2023 5:03 PM

दुपारी दोन वाजताच्या सुमारास नगर, नाशिकच्या धरणसमुहातून पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री दारणा धरण समुहातून २०० क्सूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास निळवंडे, भंडारदरा, गंगापूर, कडवा, मुकणे, दारणा या धरणसमुहातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

दारणा धरणसमुहातून ५ हजार ६९६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर निळवंडे धरणातून १० हजार क्यूसेक एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. भंडारदरा धरणातून जायकवाडीच्या दिशेने ८८४० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. कडवा धरणातून १६२४ क्यूसेक तर मुकणे धरणातून ११०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

वीजपुरवठा खंडित, पोलिस बंदोबस्त..

जायकवाडी धरणासाठी अहमदनगर, नाशिकमधील दारणा तसेच गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश ३० ऑक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते.  गंगापूर आणि मुकणे धरणातून नाशिक शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्यानंतर गोदाकाठचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यासाठी  पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गंगापूर, कडवा, मुकणे जलाशयातून आज सकाळी प्रथम ५०० क्यूसेक विसर्ग करण्यात येणार होता. व त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

जायकवाडीसाठी पाणी घेणार मोजून? नगर, नाशिकला मराठवाड्यातील अभियंत्यांची उपस्थिती

चार आठवड्यांपूर्वी आदेश

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने यासंदर्भात चार आठवड्यांपूर्वी आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर येथून राजकीय विरोध सुरू झाला होता तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र, महामंडळाच्या आदेशाला स्थगिती मिळाली नाही.

जायकवाडीसाठी गंगापूर, मुकणे धरणातून आज विसर्ग

शेतीला योग्य वेळी पाणी मिळाले नाही तर शेती उद्ध्वस्त होईल अशी भीती असल्याने समन्यायी पाणीवाटपाची मराठवाड्यातून मागणी होत होती. पाणीटंचाई असताना नाशिक आणि नगरमधून ९ टीएमसी पाणी सोडल्यास जायकवाडीपर्यंत ६ टीएमसी पाणी पोहोचणार असून ३ टीएमसी पाण्याचा अपव्यय होणार असल्याने नाशिक आणि नगरमधून पाणी सोडण्यास विरोध होत होता.

धरणातून सोडलेला व नदीत वाहत असलेला पाणी विसर्ग (क्युसेक्स ).     

 १) भंडारदरा (प्रवरा)----८८४०                                

२) निळवंडे (प्रवरा)------१०,०००                                    

३) देवठाण (आढळा)-----०००.                       

४ भोजापूर(म्हाळुंगी)-----०००                                

५) ओझर बंधारा (प्रवरा)--०००                                                                                       

६) मुळा धरण(मुळा)------००००                 

नाशिक जिल्हा                

१)गंगापूर (गोदावरी)-----४७२६   (सायंकाळी ५ नंतर :  २६१६ क्युसेक्स)                  

२)दारणा धरण (दारणा)--५६९६                                

३)कडवा -----१६२४.                    

४)मुकणे-------११००                                                                                                                                                                             

टॅग्स :जायकवाडी धरणनाशिकअहमदनगरमराठवाडा वॉटर ग्रीडधरणपाणी