Join us

कमी खर्चातला जोडव्यवसाय, महिला शेतकऱ्यांना परसबागेतील कुकूटपालनाचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 16:52 IST

परभणी कृषि विज्ञान केंद्रा अंतर्गत 40 महिला शेतकऱ्यांना परसबागेतील कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

'भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत व जीवन ज्योतचे रीटेबलट्रस्ट, परभणी संचलित कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्फत दि. 30 मार्च, 2024 रोजी "विशेष अनुसुचित जाती उपघटक" प्रकल्पाअंतर्गत "परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम" डॉ. प्रशांत भोसले, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्र, परभणी येथे आयोजीत करण्यात आले होते.

या प्रकल्पाद्वारे अनुसुचित जाती प्रवर्गातील समुदायाची सामाजीक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत, विशेष अनुसूचित जाती उपघटक समुदायातील 40 महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षणासोबत प्रत्येकी 50 कोंबड्यांची पिल्ले तसचे इतर साहित्य या मोहीमे अंतर्गत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रशांत भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकेत महिला शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्चात जोडव्यवसाय म्हणून परसबागेतील कुक्कुटपालन व्यवसाय करुन महिला व ग्रामीण युवक रोजगार निर्मिती करु शकतात, असे नमुद केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. इम्रान खान आगाई, (शास्त्रज्ञ पशुविज्ञान) यांनी परसबागेतील कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांच्या विकसीत जातीची निवड, कुक्कुटपालनाचे प्रकार तसेच खाद्य व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच कोंबड्यांचे आरोग्य व्यवस्थापन व लसीकरण करतांना घ्यावयाची काळजी, याबद्दल महिला शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रशिक्षणासाठी विविध गावातील 40 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

सौजन्य :

   वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख                                                                                                                                                                   कृषी विज्ञान केंद्र , परभणी

टॅग्स :शेतीपरभणी जिल्हा परिषददुग्धव्यवसायशेती क्षेत्र