Join us

Poultry Farming : गिरीराज आणि स्वर्णधारा कोंबडीपेक्षा वनराजा कोंबडीपालन फायदेशीर आहे का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 21:13 IST

Poultry Farming : या भागातून पोल्ट्री व्यवसायातील वनराजा कोंबडीबद्दल (Vanaraja Kombdi) माहिती घेऊयात.... 

Poultry Farming : पोल्ट्री फार्म व्यवसाय (Kombdi Palan) करताना अनेकजण कोंबडीची जात निवडताना घाई करतात. काही अनुभवी शेतकऱ्यांशी बोलून याबाबत निर्णय घेणे फायदेशीर ठरते. या व्यवसायबाबत स्वर्णधारा आणि गिरीराज कोंबडीबद्दल माहिती घेतली आहे. या भागातून वनराजा कोंबडीबद्दल (Vanaraja Kombdi) माहिती घेऊयात.... 

वनराजा (सुधारित जात) - महत्वाची आर्थिक वैशिष्टये 

  • वनराजा कोंबडी ही भा.कृ.अ.प. हैद्राबाद, तेलंगाणा प्रकल्प संचालक, पक्षीविभाग यांनी विकसित केली आहे. 
  • एक दिवसीय पिलांचे वजन हे ४५ ते ४८ ग्रॅम असते. शरीराचा रंग हा बहुरंगी असतो. 
  • लैंगिक परिपक्वता ही २४ ते २६ आठवडे या वयामध्ये येत असते. 
  • पक्षांचे वजन हे २.१ ते २.५ किलो असते. 
  • अंड्यांचे वजन हे ५५ ते ६० ग्रॅम असते. 
  • अंडी उबवणुकीतील सफल प्रमाण हे ८० ते ८५ टक्के इतके आहे. 
  • तसेच अंडी उत्पादन हे वार्षिक १५० अंड्यापर्यंत असते. अंड्यांचा रंग हा तपकिरी असतो. 

- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ पशु विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, इगतपुरी

टॅग्स :पोल्ट्रीकृषी योजनाशेती क्षेत्रशेती