Join us

Poultry Farming : हिवाळ्यात कोंबड्यांच्या खाद्यात असा करा बदल, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:13 IST

Poultry Farming : हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी कोंबड्या (Chicken Feed) जास्त प्रमाणात खाद्य खातात.

Poultry Farming : सध्या थंडीत वाढ होत असल्याने कोंबड्यांचे शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी खाद्यात बदल करणे आवश्यक असते. शिवाय कोंबड्यांच्या वाढीसाठी, उत्तम अंडी निर्मितीसाठी उत्तम दर्जाचे खाद्य पुरवणे आवश्यक असते. शिवाय या दिवसात कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खात असल्याने यात काहीसा बदल करणे महत्वाचे ठरते.. 

हिवाळ्यात कोंबड्यांच्या खाद्यात योग्य बदल करावेत. हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खातात. यामुळे खाद्यावरील खर्च जास्त होतो, ऊर्जा तयार करण्यासाठी न लागणारी पोषणतत्त्वे वाया जातात.

  • खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी आणि अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जायुक्त खाद्य पदार्थ जसे तेल, स्रिग्ध पदार्थ, प्रथिने यांचे खाद्यातील प्रमाण वाढवावे. 
  • इतर पोषणतत्त्वांचे प्रमाण तितकेच ठेवावे. 
  • आहारात ऊर्जावर्धक घटकांचे प्रमाण वाढवावे (१०० किलो कॅलरीज प्रति किलो खाद्य) आणि प्रथिनांचे प्रमाण १ ते २ टक्के कमी करणे आवश्यक असते. खाद्यामध्ये अ, क आणि ई या जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढवावे
  • एक लहान फिडर प्रती ४० पिल्लांना तर एक मोठा फिडर प्रती ३० मोठ्या कोंबड्यांसाठी वापरावा.
  • फिडरची उंची कोंबडीच्या पाठीच्या दोन इंच वर असावी.
  • खाद्यामध्ये वाया जाणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी करावे.
  • कोंबड्यांना कॅल्शियम वाढवण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगरचा साप्ताहिक डोस द्यावा.

 

- ग्रामीण कृषी सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र इगतपुरी 

टॅग्स :पोल्ट्रीशेती क्षेत्रशेतीशेतकरी